ईपीएफ मध्ये जमा रकमेवर कर : प्रश्नमंजुषा (96)
- 24 Feb 2021
- Posted By : study circle
- 82 Views
- 0 Shares
ईपीएफ मध्ये जमा रकमेवर कर : प्रश्नमंजुषा (96)
1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) दरमहा 1.74 लाख रुपयांहून जास्त बेसिक वेतन असणार्या व्यक्तीची ईपीएफ मधील वार्षिक जमा 2.50 लाखांहून जास्त होऊ शकते.
ब) ईपीएफ मध्ये दरमहा 20, 833 रुपयांहून जास्त गुंतवणूक करणार्या व्यक्तींची या निधीतील वार्षिक गुंतवणूक 2.50 लाखांचा आकडा पार करू शकते.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
2) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) वार्षिक 2.50 लाखांहून जास्त रक्कम जमा झाली असेल त्या रक्कमेवरील व्याजावर कधीपासून कर आकारणी केली जाते ?
1) 1 एप्रिल 2020 पासून
2) 1 मार्च 2021 पासून
3) 1 एप्रिल 2021 पासून
4) 1 मार्च 2020 पासून
3) खालीलपैकी कोणत्या खात्यात एखाद्या कर्मचार्यास वार्षिक वेतनाच्या टक्केवारीबरोबर स्वयंस्फूर्तीने देखील रक्कम जमा करता येते ?
1) फक्त ईपीएफमध्ये
2) फक्त ग्रॅच्युइटीमध्ये
3) ईपीएफ व ग्रॅच्युइटी या दोन्हीमध्ये
4) ईपीएफ व ग्रॅच्युइटी या दोन्हीमध्येही नाही.
4) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेला व्याजसवलत मिळते.
2) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेवर 8 टक्के परतावा मिळतो.
3) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत काही कर्मचारी दरमहा 1 कोटी रुपये जमा करतात.
4) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत वेतनाच्या ठराविक टक्केवारीशिवाय स्वयंस्फूर्तीने रक्कम जमा करता येत नाही.
5) ईपीएफ संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) ईपीएफ मध्ये 4.50 कोटींपेक्षा अधिक खाती आहेत.
ब) ईपीएफ मध्ये 1.23 कोटी खाती उच्च उत्पन्न गटातील (हाय नेट वर्थ इंडिव्युज्युअल्स) व्यक्तींची आहेत.
क) 2020-21 या आर्थिक वर्षांत उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींच्या खात्यात 62,500 कोटी रुपये जमा झाले होते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
उत्तरे : प्रश्नमंजुषा (96)
1-3
2-3
3-3
4-4
5-1