1) 2020 साली आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांचे दर कमी असूनही भारतात त्याची किंमत जास्त का होती?
1) सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 13 आणि 11 रुपयांची केंद्रीय करवाढ केली.
2) एकूण तेलाची जितकी आवशयकता आहे, त्याच्या 80 टक्के तेल भारत आयात करतो.
3) भारताला जास्त दराने तेल आयात करावे लागते.
4) भारतात तेलशुद्धीकरण प्रक्रियेचा खर्च जास्त आहे.
2) फेब्रुवारी 2021 मध्ये जगभर कच्च्या तेलाच्या किंमती का वाढल्या?
अ) सौदी अरेबियाने तेल उत्पादनात प्रतिदिन 10 लाख बॅरलची घट केली.
ब) तेलाचे दर वाढल्यानंतरही तेल उत्पादक देशांनी उत्पादनात वाढ के ली नाही.
क) करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यामुळे तेलाची मागणी वाढली.
ड) 2020 मध्ये अनेक देशात कठोर लॉकडाउन झाल्यामुळे तेलाचे दर पडले होते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) भारताला एकूण तेलाच्या गरजेच्या 70 टक्के तेल आयात करतो.
ब) फेब्रुवारी 2021 मध्ये वर्षभरानंतर पहिल्यांदाच जागतिक पातळीवर प्रति तेल पिंपाचा दर 60 डॉलरच्या पुढे गेला.
पर्यायी उत्तरे:
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही