६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ / प्रश्नमंजुषा (120)

  • ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ / प्रश्नमंजुषा (120)

    ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ / प्रश्नमंजुषा (120)

    • 07 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 332 Views
    • 0 Shares

     प्रश्नमंजुषा (120)

    १) ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटास ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार प्राप्त झाला ?
    १) कस्तूरी 
    २) मथुकुट्टी झेविअर 
    ३) ताजमाल
    ४) मरक्कर अरबीक्काडालिंटे सिंहम 

    २) खालील जोड्या अचूक जुळवा (६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार) :
        स्तंभ अ (पुरस्कार)                               स्तंभ ब (चित्रपट)
    अ. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक                      I. सुधांशु सरिया 
    ब. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक              II. मथुकुट्टी झेविअर
    क. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट दिग्दर्शक             III. संजय पुरनसिंह चौहान 
    ड. सर्वोत्कृष्ट नॉनफीचर फिल्म दिग्दर्शक      IV.  विनोद कांबळे
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    (1)   II   III   I   IV
    (2)   II   I   III   IV
    (3)   III   II   IV   I
    (4)   IV   III   I   II

    ३) बार्डो या चित्रपटासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
    १) या चित्रपटातील रान पेटल, या गाण्यासाठी सावनी रवींद्र हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 
    २) भीमराव मुडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक  आहेत.
    ३) हा चित्रपट आइन्स्टाईन यांच्या ‘थेअरी ऑफ ड्रीम रिलेटीव्हिटी’वर आधारित आहे.
    ४) यापैकी नाही
     
    ४) खालील जोड्या अचूक जुळवा (६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार) :
          स्तंभ अ ( रजत कमळ)                                                     स्तंभ ब ( मराठी चित्रपट दिग्दर्शक)
    अ. सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आनंदी गोपाळ       I. राजप्रितम मोरे
    ब. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ताजमाल     II. भीमराव मुडे 
    क. दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट नॉनफिचर चित्रपट खिसा     III. नियाझ मुजावर
    ड. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट  बार्डो                                      IV. समीर विद्वांस
    पर्यायी उत्तरे :
         ब   क   ड
    (1)   II   III   I   IV
    (2)   II   I   III   IV
    (3)   III   II    IV   I
    (4)   IV   III   I   II

    ५) सामाजिक बाबीवरील सर्वोत्कृष्ट नॉनफिचर फिल्म पुरस्कार ”होली राइटस” या चित्रपटास मिळाला.  त्याचा निर्माता/ निर्माती / निर्माते कोण आहे/ आहेत ? 
    १) संतोष मैथानी
    २) राजप्रितम मोरे
    ३) प्रियांका प्रदीप मोरे
    ४) निऑन रील क्रिएशन्स

    ६) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा (६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार):
                 स्तंभ-I (भाषा)                       स्तंभ-II (नॉनफिचर फिल्म)
    a)  सर्वोत्कृष्ट नॉनफीचर फिल्म                     (i) अॅनन इंजीनिअर्ड ड्रीम 
    b)  सर्वांगीण मनोरंजक चित्रपट                         (ii) महर्षि 
    c)  सर्वोत्कृष्ट चित्रपट पर्यावरणावरील           (iii) वॉटर बरिअल 
    d)  स्पेशल ज्युरी अवॉर्ड नॉनफीचर फिल्म          (iv)   स्मॉल स्केल सोसायटीज
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)    (c)   (d)
    १)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    २)   (iv)    (i)   (ii)   (iii)
    ३)   (iii)   (iv)   (i)   (ii)
    ४)   (iii)   (iv)   (ii)   (ii)

    ७) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत, दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी (इंदिरा गांधी पुरस्कार) किती रकमेचा पुरस्कार मिळतो ?
    १)  प्रत्येकी २.५० लाख रुपये.
    २)  प्रत्येकी २.०० लाख रुपये.
    ३)  प्रत्येकी १.५० लाख रुपये.
    ४)  प्रत्येकी १. ०० लाख रुपये.

    ८) नॉनफिचर फिल्म पुरस्कार २०१९ बाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
    १) बेस्ट डिरेक्टर - सुधांशु सरिया यांना नॉक, नॉक, नॉक चित्रपटासाठी 
    २) बेस्ट अॅरनिमेशन फिल्म - वाईल्ड कर्नाटका
    ३) बेस्ट नॉन फिचर फिल्म - अॅुन इंजीनिअर्ड ड्रीम
    ४) बेस्ट सिनेमॅटोग्राफी - सविता सिंह यांना सौंसी या चित्रपटासाठी

    ९) दादासाहेब फाळके हे केवळ चित्रपट निर्मातेच होते असे नाही, तर त्या व्यतिरिक्त ते पुढीलपैकी कोण होते?
    a) रंगभूषाकार, नेपथ्यकार होते
    b) छाया चित्रकार होते
    c) कथाकार, नृत्यतज्ज्ञ होते
    d) अभिनेते होते
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b) फक्त
    २) (b) आणि (c) फक्त
    ३) (c) आणि (d) फक्त
    ४) (a) आणि (d) फक्त

    १०) २०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, दिग्दर्शकाच्या पदार्पणाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा इंदिरा गांधी पुरस्काराचा मानकरी दिग्दर्शक व चित्रपट शोधा. 
    १) मथुकुट्टी झेविअर (हेलन, मल्याळी चित्रपट) 
    २) समीर विद्वांस (आनंदी गोपाळ मराठी चित्रपट)
    ३) भीमराव मुडे (बोर्डो, मराठी चित्रपट)
    ४) नियाज मुजावर (ताजमाल, मराठी चित्रपट)

    ११) खालील जोड्या अचूक जुळवा :
              स्तंभ अ (पुरस्कार)                          स्तंभ ब (चित्रपट)
    अ. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका                          I. लता करे 
    ब. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री                    II. सावनी रवींद्र 
    क. विशेष नोंदीस पात्र अभिनय                         III. पल्लवी जोशी 
    ड. सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी /साउंड डिझायनर IV. मंदार कमलापूरकर 
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    (1)   II   III   I   IV
    (2)   II   I   III   IV
    (3)   III   II   IV    I
    (4)   IV   III   I   II

    १२) ताजमाल या चित्रपटाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
    १) हा चित्रपट भीमा कोनाडे या गरीब शेतकर्यावच्या जीवनाविषयी आहे.
    २) मामी आणि एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे.  
    ३) या चित्रपटाचे दिग्दर्शक नियाज मुजावर हे आहेत.
    ४) या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला

    १३) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा (६७ वे राष्ट्रीय चित्रपट बेस़्ट नॉनफिचर फिल्म पुरस्कार):
                 स्तंभ-I (भाषा) स्तंभ-II (नॉनफिचर फिल्म)
    a)  बेस्ट मराठी फिल्म                  (i) जोनाकी पोरवा 
    b)  बेस्ट आसामी फिल्म               (ii) भुलन दी मेज 
    c)  बेस्ट छत्तीसगढी फिल्म          (iii) बिरीयानी 
    d)  बेस्ट मल्याळी फिल्म               (iv) पिकासो
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)    (d)
    १)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    २)   (iv)   (i)   (ii)   (iii)
    ३)   (iii)   (iv)   (i)   (ii)
    ४)   (iii)   (iv)   (ii)   (ii)

    १४) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
    १) सुवर्ण कमळ हे फिचर फिल्म, नॉनफिचर फिल्म व चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी दिले जाते.
    २) रजत कमळ हे फिचर फिल्म, नॉनफिचर फिल्म व चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी दिले जाते.
    ३) सुवर्ण कमळ हे फिचर फिल्म, नॉनफिचर फिल्म व प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिले जाते.
    ४) रजत कमळ हे फिचर फिल्म, नॉनफिचर फिल्म व प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिले जाते.

    १५) पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणत्या पुरस्काराचे वर्णन केले आहे ?
    a) १९५४ सालापासून हे पुरस्कार सुरु झाले. 
    b) त्यांचे सुरुवातीचे नाव ‘स्टेट अॅकवॉर्डस् फॉर फिल्म्स’ असे होते.
    c)  २०१९ सालच्या या पुरस्कारांची घोषणा अरूण चढ्ढा यांनी केली.
    d)  सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटांना दिले जातात.
    पर्यायी उत्तरे :
    १) फिल्मफेअर पुरस्कार
    २) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
    ३) आयफा चित्रपट पुरस्कार
    ४) आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट (इफ्फी) पुरस्कार

    १६) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत, चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी कोणता पुरस्कार दिला जातो ?
    १)  सुवर्णकमळ व ७५ हजार रुपये.
    २)  रजतकमळ व ५० हजार रुपये.
    ३)  सुवर्णकमळ व १ लाख रुपये.
    ४)  रजतकमळ व ७५ हजार रुपये.

    १७) खालील जोड्या अचूक जुळवा :
              स्तंभ अ (पुरस्कार)                                            स्तंभ ब (चित्रपट)
    अ. राष्ट्रीय एकात्मतेवरील नर्गिस दत्त पुरस्कार                       I. जक्कल
    ब. सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट                       II. आनंदी गोपाळ 
    क. कथाबाह्य चित्रपट विभागात उत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण पुरस्कार       III. ताजमाल
    ड. उत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्मचा पुरस्कार                      IV. खिसा 
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    (1)   II   III   I   IV
    (2)   II   I   III   IV
    (3)   III   II   IV   I
    (4)   IV   III   I   II

    १८) खालीलपैकी कोणत्या चित्रपटातील भूमिकेसाठी मनोज वाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९) पुरस्कार मिळाला ?
    १) असुरन
    २) भोसले
    ३) मोनपा
    ४) भट्टर हुरे इन

    १९) खालील विधानांचा विचार करा :
    a) लता भगवान करे या चित्रपटात लता करे यांनी स्वत: ची भूमिका साकारली आहे.
    b) लता करे यांनी नवर्या्च्या उपचारासाठी वयाच्या ६५ व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये भाग घेत ती शर्यत जिंकली होती.
    पर्यायी उत्तरे :
    १) विधान (a) सत्य आहे आणि (b) विधानाची कारणमिमांसा आहे.
    २) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.
    ३) (a) विधान सत्य आहे परंतु (b) चूक आहे.
    ४) (a) आणि (b) सत्य आहेत, पण एकमेकांशी संबंधित नाहीत.

    २०) ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत, चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या पुस्तकास मिळाला?
    १) अशोक राणे यांचे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ 
    २) संजय सुरींचे ‘अ गांधीयन अफेयर’  
    ३) कन्नड भाषेतील सिनेमावरील पुस्तक 
    ४)  वरील सर्व

    २१) पुढील विधनांचा विचार करा :
    a) जागतिक प्रीमिअर झालेला अॅःमेझॉन प्राइम व्हिडीओचा पहिला मराठी चित्रपट म्हणजे पिकासो. 
    b) अॅ मेझॉन प्राईम व्हिडिओने १०० हून अधिक देशांमध्ये चित्रपट पोहोचवला. 
    पर्यायी उत्तरे :
    १) दोन्ही विधाने चूक आहेत.
    २) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा आहे.
    ३) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा नाही.
    ४) (a) बरोबर परंतु (b) चूक आहे.

    २२) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट (नर्गिस दत्त पुरस्कार)  पुरस्काराची रक्क्म किती आहे ?
    १)  प्रत्येकी २.५० लाख रुपये.
    २)  प्रत्येकी २.०० लाख रुपये.
    ३)  प्रत्येकी १.५० लाख रुपये.
    ४)  प्रत्येकी १. ०० लाख रुपये.

    २३) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) :  ‘बाहुबली’ या चित्रपटास, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार मिळाला होता.
    कारण (र) : १९७५ पासून निखळ मनोरंजन करणार्याच लोकप्रिय चित्रपटांनाही राष्ट्रीयि चत्रपट  पुरस्कार मिळू लागले. 
    पर्यायी उत्तरे :
    १)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    २)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    ३)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    ४)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.

    २४) खालीलपैकी कोणती जोडी २०१९ साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत चुकीची आहे ?
    १) सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर अरबीक्काडालिंटे सिंहम (मल्याळी)
    ३) सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले) आणि धनुष (असुरन)
    ४) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स)
    ५) सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : जक्कल (मराठी)

    २५) आसुरन चित्रपटाबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) हा चित्रपट साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक पुमणी यांच्या ‘वेक्कई’ या कादंबरीवर आधारित आहे. 
    ब) या चित्रपटासाठी अभिनेता धनुष याला राष्ट्रीय पुरस्कार २०१९ जाहीर झाला. 
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त अ
    २) फक्त ब
    ३) अ आणि ब दोन्ही
    ४) कोणतेही नाही

    २६) ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वागायिकेचा पुरस्कार सावनी रवींद्र (बार्डो या मराठी चित्रपटातील ’रान पेटलं’ या गाण्यासाठी) मिळाला, त्याचे स्वरुप काय आहे ?
    १)  रजतकमळ, प्रशस्तिपत्र व  रोख रक्क्म १ लाख रुपये
    २)  रजतकमळ, प्रशस्तिपत्र व  रोख रक्क्म १ लाख रुपये
    ३)  सुवर्णकमळ, प्रशस्तिपत्र व  रोख रक्क्म ५० हजार रुपये
    ४)  रजतकमळ, प्रशस्तिपत्र व  रोख रक्क्म ५० हजार रुपये

    २७) पुढील विधाने विचारात घ्या :
    a) ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. 
    b)  या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार २०१९ मिळाला.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) बरोबर आहे.
    २) फक्त (b) बरोबर आहे.
    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
    ४) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.

    २८) खालीलपैकी कोणत्या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना राणावत यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९) पुरस्कार मिळाला ?
    १) मनकर्णिका
    २) पंगा
    ३) केसरी
    ४)१ आणि २

    २९) त्रिज्या चित्रपटाबाबतच्या खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
    a) या चित्रपटात अवधूत या मुलाचा प्रवास चित्रित केला गेला आहे.
    b) ध्वनिसंरचनेसाठीचा (साऊंड डिझायनिंग) राष्ट्रीय पुरस्कार मंदार कमलापूरकर यांना  मिळाला.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b) बरोबर
    २) (a) बरोबर (b) चूक
    ३) (a) चूक (b) बरोबर
    ४) (a) आणि (b) चूक

    ३०) ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या कस्तूरी या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक  कोण ?
    १) प्रियदर्शन
    २)  संजय पुरनसिंह चौहान
    ३) विनोद कांबळे
    ४) सुधांशु सरिया 

    ३१) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा (६७ वे राष्ट्रीय चित्रपट):
            स्तंभ-I (भाषा)                स्तंभ-II (चित्रपट)
    a)  बेस्ट मराठी फिल्म     (i) जर्सी
    b)  बेस्ट तेलुगु फिल्म     (ii) कला नोत्तम 
    c)  बेस्ट तमिल फिल्म     (iii) बारडो
    d)  बेस्ट मल्याळी फिल्म             (iv) असुरन 
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c) (d)
    १)   (i)   (ii)   (iii) (iv)
    २)   (iv)   (i)   (ii) (iii)
    ३)   (iii)   (iv)   (i) (ii)
    ४)   (iii)  (iv) (ii) (ii)

    ३२) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत, सर्वांगीण मनोरंजानाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी (इंदिरा गांधी पुरस्कार) किती रकमेचा पुरस्कार मिळतो ?
    १)  प्रत्येकी २.५० लाख रुपये.
    २)  प्रत्येकी २.०० लाख रुपये.
    ३)  प्रत्येकी १.५० लाख रुपये.
    ४)  प्रत्येकी १. ०० लाख रुपये.

    ३३) खालील कथने लक्षात घ्या :
    a) खिसा या लघुपटासाठी पदार्पणीय दिग्दर्शकाचा पुरस्कार राज मोरे यास मिळाला. 
    b) खिसा या लघुपटात महाराष्ट्रातील दुर्गम गावात राहणार्यार एका लहान मुलाची कहाणी आहे.
    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत ?
    १) फक्त (a)
    २) फक्त (b)
    ३) (a) आणि (b) दोन्ही
    ४) (a) आणि (b) दोन्ही नाही

    ३४) खालील विधानांपैकी कोणते विधान आनंदी गोपाळ या चित्रपटाबाबत बरोबर नाही ?
    १)  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा पुरस्कार मिळाला.
    २)  या चित्रपटाल सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला.
    ३)  या चित्रपटाची कथा ही डॉ. आनंदी गोपाळ आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्याभोवती फिरते.
    ४)  या चित्रपटास दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला.

    ३५) खालीलपैकी कोणती विधान/विधाने ”जक्कल चित्रपटा” बद्दल सत्य आहे/आहेत?
    a) या माहितीपटास उत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार २०१९ मिळाला.
    b)  पुण्यात घडलेल्या अभ्यंकर - जोशी हत्यासत्राचा विविध अंगाने मागोवा या चित्रपटात घेण्यात आला आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त
    २) (b) फक्त
    ३) (a) आणि (b) दोन्ही
    ४) वरीलपैकी कोणतेही नाही

    ३६) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री /अभिनेत्यास किती रकमेच्चे रजतकमळ दिले जाते ?
    १)  प्रत्येकी ५० हजार रुपये.
    २)  प्रत्येकी ७५ हजार रुपये.
    ३)   प्रत्येकी १.५० लाख रुपये.
    ४)  प्रत्येकी १. ०० लाख रुपये.

    ३७) खालीलपैकी कोणती जोडी २०१९ साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत चुकीची आहे ?
    १) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा)
    २) सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट : महर्षि (तेलुगु) 
    ३) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : विजय सेतूपती (सुपर डिलक्स)
    ४) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : सावनी रवींद्र (बार्डो)

    उत्तरे : प्रश्नमंजुषा (१२०)
    १-४
     
    २-३
     
    ३-४
     
    ४-४
     
    ५-३
     
    ६-१
     
    ७-१
     
    ८-२
     
    ९-१
     
    १०-१
     
    ११-१
     
    १२-२
     
    १३-२
     
    १४-१
     
    १५-२
     
    १६-१
     
    १७-३
     
    १८-२
     
    १९-४
     
    २०-४
     
    २१-४
     
    २२-३
     
    २३-१
     
    २४-४
     
    २५-३
     
    २६-४
     
    २७-३
     
    २८-४
     
    २९-१
     
    ३०-३
     
    ३१-४
     
    ३२-२
     
    ३३-४
     
    ३४-४
     
    ३५-३
     
    ३६-१
     
    ३७-२

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 332