दादासाहेब फाळके पुरस्कार / अभिनेते रजनीकांत / प्रश्नमंजुषा (117)
- 03 Apr 2021
- Posted By : Study Circle
- 290 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (117)
1) दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.
2) दरवर्षी भरवल्या जाणार्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
3) या नावाचा पुरस्कार देशातील बिगर सरकारी संस्था देऊ शकत नाहीत.
4) 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे.
2) अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटांचा योग्य कालानुक्रम ओळखा.
1) चंद्रमुखी, शिवाजी द बॉस, अंधा कानून, दलपती
2) चंद्रमुखी, अंधा कानून, दलपती, शिवाजी द बॉस
3) अंधा कानून, दलपती, चंद्रमुखी, शिवाजी द बॉस
4) अंधा कानून, शिवाजी द बॉस, दलपती, चंद्रमुखी
3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) सुरुवातीस दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 20 हजार रुपये होती.
ब) व्ही. शांताराम हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे पहिले मराठी कलाकार होत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
4) अभिनेते रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
1) रजनीकांत यांना मिळालेला हा 67 वा पुरस्कार आहे.
2) पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपये आहे.
3) रजनीकांत हे सदर पुरस्कारप्राप्त 51 वे कलाकार आहेत.
4) सदर पुरस्कार हा सिनेसृष्टीतील फक्त कलावंतांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
5) पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे ?
a) त्यांचे मूळ गांव पुणे जिल्ह्यातील, पुरंंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे आहे.
b) कोल्हापूर व जुन्नर या ठिकाणी असलेल्या नातेवाइकांमुळे त्यांचे बालपण महाराष्ट्रात गेले.
c) त्यांच्या सहचारिणीचे नाव लता रंगाचारी.
d) कन्नड कवी डी. आर. बेंद्रे यांनी ते महानायक होणार, असे भविष्य वर्तवले होते.
पर्यायी उत्तरे :
1) भीमसेन जोशी
2) कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे
3) बाळूमामा चव्हाण
4) शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
6) तमिळ भाषेतील ’अपूर्वा रागंगल’ या चित्रपटात कोणी मुख्य भूमिका केली होती ?
1) रजनीकांत
2) एम. जी. रामचंद्रन
3) शिवाजी गणेशन
4) कमल हसन
7) पुढील विधाने विचारात घ्या :
a) पृथ्वीराज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला होता.
b) व्ही. के. मूर्ती हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे पहिले चलचित्रकार होत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) बरोबर आहे.
2) फक्त (b) बरोबर आहे.
3)(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
4) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
8) रजनीकांत यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेलेले ते एकमेव अभिनेते आहेत.
2) दलपती या चित्रपटाने रजनीकांत त्यांना थेट सुपरस्टार पदावर नेले.
3) ते आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले होते.
4) जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
9) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा :
गट -अ (तपशील) गट-ब (व्यक्ती)
a) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली व्यक्ती (I) देविका राणी
b) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिले चित्रपट निर्माते (II) बीरेन्द्रनाथ सरकार
c) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिले संगीतकार (III) पंकज मलिक
d) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिले दिग्दर्शक (IV) बी. एन.(बोम्मिरेड्डी नरसिम्हा) रेड्डी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iv) (i) (ii) (iii)
3) (iii) (iv) (i) (ii)
4) (iii) (iv) (ii) (iv)
10) रजनीकांत यांना मिळालेल्या बहुमानासंदर्भात चुकीची जोडी ओळखा.
1) 2000 - पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.
2) 2007 - महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार)
3) 2016 - पद्मविभूषण बहुमान
4) 2020 - दादासाहेब फाळके पुरस्कार
उत्तरे : प्रश्नमंजुषा (117)
1-3
2-3
3-4
4-4
5-4
6-4
7-3
8-2
9-1
10-4