निर्णय प्रक्रिया व समस्या निराकारण / प्रश्नमंजुषा (116)
- 02 Apr 2021
- Posted By : study circle
- 582 Views
- 0 Shares
राज्यसेवा पूर्वपरीक्षा, 21 मार्च 2021 सीसॅट पेपर
निर्णय प्रक्रिया व समस्या निराकारण घटकावरील प्रश्न
1) पर्यावरणीय अंकेक्षणात विशेषज्ञ असणार्या एका अशासकीय संस्थेचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. शासनाच्या मालकीच्या कोळसा वापरून ऊर्जा उत्पादन करणार्या विभागांबद्दल तुमच्या चमूने अहवाल गठित केला आहे. या विभागांनी प्रदूषण संकेत पूर्णतया धुडकावून दिल्याचे तुमच्या अहवालातून दाखवले आहे. जर हा अहवाल प्रसिद्ध केला तर तुम्ही काम करत असलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी धमकी काही शासकीय अधिकारी तुम्हाला देत आहेत. ते शासकीय प्रयोगशाळांवर या विभागांबाबत त्यांच्या सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी दबाव आणत आहेत व यामुळे तुमच्या अशासकीय संस्थेची विश्वासार्हता डागाळली जाणार आहे. या परिस्थितीत तुम्ही ...... प्राधान्य द्याल.
1) ... तुमचे निष्कर्ष अशाच प्रकारच्या कामात गुंतलेल्या अन्य त्रयस्थ संस्थेच्या प्रयोगशाळेकडून दुजोरा मिळवून नंतर ते जनतेसाठी उघड करण्याला ...
2) ... कालबाह्य यंत्रसामग्रीवर ठपका ठेवत अहवाल आहे तसा उघड करण्याला ...
3) ... हा अहवाल प्रथम सर्वोच्च वरिष्ठांकडे सादर करा व त्यांना त्याबाबत अन्वेषण करण्यासाठी व सुधारणा करून चुका दुरुस्त करण्यासाठी पुरेसा अवधी देत त्यांच्या प्रतिसादासाठी थांबण्याला ...
4) ... धमकीची अजिबात पर्वा न करता जनतेसाठी अहवाल उघड करण्याला ...
2) नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्याशी संबंधित काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार होत्या परंतु दुर्दैवाने विक्री घटल्याने त्यामुळे त्यात तोटा झाला. या समस्येच्या चौकशीसाठी अस्थापन व्यवस्थापनाने समिती संघटित केली आहे. या समितीने या प्रश्नासंबंधाने माहिती घेण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे. घेतलेल्या निर्णयाची तुम्ही पाठराखण करावी असे तुमच्या वरिष्ठांचे तुम्हाला सांगणे आहे. येत्या दोन-तीन वर्षांसाठी त्या तुमच्या वरिष्ठ असणार आहेत. तुम्ही,
1) परिस्थितीचे निःपक्षपाती वर्णन कराल आणि भविष्यात नुकसान टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या निर्णयांसंबंधीचे तुमचे चिकित्सक दृष्टिकोन तुम्ही व तुमचे संघ सदस्य कनिष्ठ असूनही आग्रहाने मांडाल याची समितीला खात्री द्याल.
2) वरिष्ठांवर दोषारोप येण्यामुळे त्याचा त्यांच्या व तुमच्या व्यावसायिक सहसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असूनही जे काही घडले त्याचे यथातथ्य वर्णन कराल.
3) या घटनेशी संबंधित जे काही घडले त्याचे यथातथ्य वर्णन कराल आणि तसे करताना वरिष्ठांनी तुमच्यासारख्या कनिष्ठ सहाय्यकांचा सल्ला कसा झटक्यात फेटाळून लावला यावर भर द्याल.
4) तुमच्या वरिष्ठांना अपमानापासून वाचवण्यासाठी तसेच तुमच्या व त्यांच्या व्यावसायिक सहसंबंधात बाधा येऊ नये यासाठी संबंधित घटनेसंबंधाने तुम्ही अनभिज्ञ आहात असे दाखवाल.
3) तुम्ही एका भागाची जबाबदारी असलेले वरिष्ठ नागरी अधिकारी आहात आणि तुम्हाला वृद्धांसाठी खाजगीरित्या चालवल्या जाणार्या घरांच्या वार्षिक संमेलनासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. या जागी पोहचण्यासाठी प्रवास करताना तुम्हाला जागोजागी मोडकळीला आलेल्या झोपड्यांच्या अनेक वस्त्या पाहायला मिळाल्या. जेव्हा तुम्ही चौकशी केली तेव्हा वृद्धांसाठी घरे निर्माण करणार्या विकासकांनी त्यांचे सर्व स्रोत हडप केले असून त्यांना लहानशा जागेत राहण्यास भाग पाडले असल्याचे या लोकांनी सांगितले. वृद्धांसाठी घरांची वस्ती निर्माण करणारे व त्यात राहणारे लोक उच्च जातीचे असल्यामुळे ते त्यांना नदीचे पाणी वापरण्यास, नदीत आंघोळ करण्यास वा मासेमारी करण्यास, वनौपज वापरण्यास मज्जाव करत असल्याचेही त्यांनी तुम्हाला सांगितले. तुम्ही पुढीलपैकी ...... प्राधान्य द्याल.
1) ... या भागाच्या नागरी क्षेत्रातील महाविद्यालयांतील, स्वतःच्या विद्यार्थ्यांना मानव्य आणि समाजविज्ञानातील सिद्धांतासंबंधाने व्यावहारिक अनुभव घ्यायला मदत देण्यात स्वारस्य असणार्या अध्यापकांच्या मदतीने त्या भागातील लोकांचे सक्षमीकरण करण्याची योजना आखून ती महामंडळाकडून निधी मिळवून कार्यान्वित करण्याला ...
2) ... भेट रद्द करून, संयोजकांकडे या परिस्थितीबाबत स्वतःची नाराजी व्यक्त करून त्या भागातील लोकांना तेथील स्रोत उपभोगू देताना त्यांचा हक्क त्यांना द्यावा असा आदेश त्यांना देण्याला ...
3) ... संमेलनाला उपस्थित रहाल व परिस्थितीबाबत योग्य माहिती मिळवून मित्रभावनेने संयोजकांना व रहिवाशांना स्रोतांच्या खर्या मालकांबद्दल सहानुभूती दाखवण्याबद्दल समजावून देण्याला ...
4) ... काहीही कार्यवाही करणार नाही कारण प्रत्येकाला स्वतःच्या नशिबासह जगावे लागते यावर तुमचा विश्वास ठेवण्याला ...
4) तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करणार्या एका कृतिशील गटाचे तुम्ही सदस्य आहात. दर पाच दिवसांनी भारतात एक सफाई कर्मचारी मरतो ही बातमी ऐकल्यापासून गटाचे सर्व सदस्य अस्वस्थ झालेले आहेत आणि या परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा आहे. विपन्नावस्थेत असलेला सफाई कर्मचारी जेव्हा गटारात गुदमरून किंवा अपघाताने मरतो तेव्हाच त्याची बातमी बनते पण कोणीही स्वतःच्या अधिकारात मही आमची समस्या आहे; आम्ही त्यावर उपाय करूफ असे म्हणताना ऐकू येत नाही. जरी अनेक ख्यातनाम व्यक्ती सफाई करणे हा मआध्यात्मिक अनुभव आहेफ असे सांगत असले तरी प्रत्येक सफाई कर्मचारी अन्य लोकांची विष्ठा हाताने साफ करतो कारण त्याच्याकडे पर्याय नसतो आणि ज्या जमाती सफाईशी जोडलेल्या आहेत त्यात जन्माला येणार्यांना पर्यायी नोकर्या मिळत नाहीत या वस्तुस्थितीशी तुम्ही सर्व परिचित आहात. काही संस्थांच्या अंदाजानुसार आपल्या देशातील अशा सफाई कर्मचार्यांची संख्या 1,50,000 च्या जवळपास असावी. या गटाचे सदस्य म्हणून तुम्ही इतर सदस्यांना ... प्रेरित करायला प्राधान्य द्याल.
1) ... निधी गोळा करून हे हातसफाईचे असभ्य (?) काम स्वतःवर घेणारे तांत्रिक उपकरण विकसित करण्यासाठी अन्वेषक गाठण्याला ...
2) ... सफाई कर्मचारी हातसफाईचा आणि भेदभाव सहन करण्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या जातींतून येत असल्यामुळे याचा सामाजिक प्रश्न म्हणून गुंता सोडवण्याला ...
3) ... जेव्हा व्यक्ती अशा जातीत वाढते तेव्हा तिची किंवा त्याची अन्यायाच्या विरोधात उभे टाकण्याची क्षमता जन्मतःच पांगळी केली जाते म्हणून सफाई कर्मचार्यांना सक्षम व्हायला साहाय्य करण्याला ...
4) ... सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तींच्या दुर्दशेसंबंधाने संवेदनशील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्यांच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याला ...
5) गेली काही वर्षे उद्योगांना प्रोत्साहन देणार्या विभागाचे तुम्ही प्रमुख आहात आणि आत्तापर्यंत मफआम्ही गेली अनेक वर्षे हे करत होतो आणि उत्तम नफा मिळवत होतो आणि नुकसान टाळावे तर नजीकच्या भविष्यात आपण हीच प्रक्रिया चालू ठेवली पाहिजेफफ हा नियम होता. पण आता व्यवसाय चालवण्याचा कोणताही अनुभव नसलेले तरुण उद्योजक तुम्ही कधीही न ऐकलेल्या कल्पनांवर आधारित योजना घेऊन तुमच्याकडे येत आहेत आणि अंशतः आर्थिक मदतीसाठी निवड करणे तुमच्यासाठी कठीण होत आहे. तुम्ही,
1) या व्यक्ती संशोधनाधारित नव्या प्रक्रिया कशारीतीने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहेत, समाजाच्या नव्या वा बदलत्या गरजा हेरून उत्पादन कसे रचतात आणि त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचे कसे उपयोजन करून राबवतात हे अभ्यासाल व नंतर आराखडे निवडाल.
2) उपलब्ध निधी जबाबदारीने हाताळावा अशी तुलनात्मक अपेक्षा असल्याने गेली जवळपास पंचवीसहून अधिक वर्षे ज्याप्रमाणे नियम पुस्तिकेच्या आधारे काम केले तसेच करून सुरक्षित रहाल.
3) पुरेसा वेळ घेऊन योजना विस्ताराने अभ्यासाल आणि त्या निवडण्यासाठी नवे लवचीक व विशिष्ट उद्योगाच्या ज्ञानयुगीन गरजा लक्षात घेऊन नियम करण्यासाठी पुढाकार घ्याल.
4) राज्यात उद्योजकता प्रस्थापित करण्यासाठी जे नुकसानीची जोखीम हाताळण्यासाठी लागणार्या धाडस वित्तासह सज्ज आहेत अशांच्या योजना निवडून त्यांना त्यांच्या नव्या कल्पनांवर प्रयोग करू द्याल.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (116)
1 2 3 4
1) 1.5 1 2.5 0
2) 2.5 1.5 1 0
3) 2.5 1 1.5 0
4) 1.5 0 1 2.5
5) 2.5 0 1.5 1