गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५) / प्रश्नमंजुषा १२७
- 12 May 2021
- Posted By : study circle
- 993 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा १२७
महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर भरती आयोगांच्या स्पर्धा परीक्षात ”गोपाळ कृष्ण गोखले” यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल प्रश्नक विचारले गेलेले आहेत. त्यातील काही प्रश्न येथे पोस्ट करीत आहोत- टीम स्टडी सर्कल.
♦ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील पुढील घटकावरील प्रश्नांसमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांचा उल्लेख आहे -
१) वसाहत शासनकालीन अर्थव्यवस्था - आर्थिक राष्ट्रवादाचा पाया, न्या. रानडे यांचा प्रभाव
२) महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास - सार्वजनिक सभा, भारत सेवक संघ
३) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारप्रणाली व कार्य
४) इंडियन नॅशनल काँग्रेस - स्थापना व मवाळवादी कालखंड
५) महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान - लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमधील गोखले यांची भाषणे, महात्मा गांधाजींचे राजकीय गुरु.
१) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) नामदार गोखले हे न्या. महादेव गोविंद रानडे यांना आपले गुरू मानत असत.
२) महात्मा गांधीजी हे नामदार गोखले यांना आपले गुरू मानत असत.
३) जवाहरलाल नेहरु हे महात्मा गांधीजी यांना आपले गुरू मानत असत.
४) न्या. रानडे हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना आपले गुरू मानत असत.
२) खालील व्यक्तींपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते?
a) बी. जी. टिळक
b) जी. के. गोखले
c) धों. के. कर्वे
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) फक्त
२) (b), (c) फक्त
३) (a), (c) फक्त
४) (a), (b), (c)
३) पूर्व राष्ट्रवादी नेत्यापैकी कोण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आणि पुणे सार्वजनिक सभेचे सचिव होते आणि बॉम्बे प्रोव्हिन्सियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल येथील निवडक सदस्य या रूपाने सेवा केली होती ?
१) डॉ. आत्माराम पांडुरंग
२) महादेव गोविंद रानडे
३) गोपाळ कृष्ण गोखले
४) आर. जी. भांडारकर
४) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) गोपाळ कृष्ण गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले.
ब) गोपाळ कृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे झाले.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
५) गोखले यांचे कोणते भाषण ऐकल्यावर, असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही क्वचितच ऐकावयास मिळते, असा अभिप्राय व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो यांनी दिला होता ?
१) १८९७ मध्ये गोखले यांनी वेल्बी कमिशनपुढे साक्ष देताना केलेले भाषण
२) १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करताना केलेले भाषण
३) १९०५ सालच्या अर्थसंकल्पावरील केंद्रीय कायदे मंडळात केलेले भाषण
४) १९०६ सालच्या अर्थसंकल्पावरील केंद्रीय कायदे मंडळात केलेले भाषण
६) गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांनी काही काळ कार्य केले.
ब) १८८५ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर पहिले भाषण केले.
क) १९०२ मध्ये त्यांची केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद म्हणून नियुक्ती झाली.
ड) १८९० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची फेलो म्हणून नियुक्ती झाली.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ आणि क बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
७) लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोपाळ कृष्ण गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. हा आयोग कशासाठी नेमण्यात आला होता ?
१) ब्रिटिशाद्वारे भारताच्या संपत्तीचे होणारे शोषण कमी करण्यासाठी
२) कॉग्रेसमधील मवाळ गटाच्या माग़ण्यावर चर्चा करण्यासाठी
३) भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी
४) वरील सर्व
८) गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या वृत्तपत्रांतून लेखन केले वृत्तपत्रांतून त्यांनी लेखन केले ?
अ) सार्वजनिक सभा व राष्ट्रसभा समाचार
ब) केसरी व मराठा
क) सुधारक
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
४) अ, ब आणि क
९) ” उपहास वा घणाघाती घाव हा त्यांच्या भाषणाचा विशेष नव्हे, तर प्रतिपक्षाचे मत समर्पक युक्तिवाद करून वळविण्यावर त्यांचा कटाक्ष असे. गोखले केंद्रीय कायदेमंडळात बोलू लागले, की आपल्यापुढे गुलाब पुष्पांचा सडा पडल्यासारखा वाटे, ” असे ..... यांनी म्हटले आहे.
१) दादाभाई नवरोजी
२) सी. वाय. चिंतामणी
३) लॉर्ड वेडरबर्न
४) व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो
१०) जोड्या जुळवा :
अ) नेशनचे संपादक मॅसिंगहॅम I. गोखले हे इंग्लंडचे पंतप्रधान अॅास्क्विथ यांच्या पेक्षाही श्रेष्ठ
ब) हायलँड II. गोखले यांची तुलना इटलीतील काव्हूरशी केली
क) लॉर्ड वेडरबर्न III. वेल्बी आयोगापुढील साक्षीसाठी गोखले यांनी तयार केलेल्या मसुद्यात काडीचाही फेरफार करण्याची गरज नाही.
ड) महात्मा गांधींजी IV. गोखले यांचा धर्मात्मा गोखले म्हणून उल्लेख
अ ब क ड
१) I IV III II
२) III II IV I
३) I II IV III
४) I II III IV
११) गोपाळ कृष्ण गोखले पुणे येथील ....... महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते.
१) फर्ग्युसन
२) डेक्कन
३) सर परशुरामभाऊ
४) वाडिया
१२) सरकारी खर्चाचा उद्देश व प्राथमिकता काय असाव्यात यावर नामदार गोखले यांनी केलेली खालील विधाने विचारात घ्या :
अ) केंद्रीय अर्थसंकल्पातील शिल्लक रक्कम अनुदान स्वरूपात ग्रामीण स्वराज्य संस्थाना द्यावी.
ब) मुलामुलींच्या मोफत शिक्षणासाठी म्युनिसिपालिटी आणि स्थानिक मंडळांना सरकारकडून अनुदान देण्यात यावे.
क) शिक्षण हे आर्थिक आणि सामाजिक कल्याणाचे पायाभूत साधन आहे
ड) रेल्वेच्या विकासापेक्षा स्वच्छ पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यांची गरज अधिक महत्त्वाची आहे
पर्यायी उत्तरे :
१) विधाने अ, ब आणि क बरोबर
२) विधाने ब, क आणि ड बरोबर
३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
४) विधाने अ, क आणि ड बरोबर
१३) गोपाळ कृष्ण गोखले पुणे येथील कोणत्या शाळेत गणिताचे शिक्षक होते.
१) न्यू इंग्लिश स्कूल
२) नूतन मराठी विद्यालय
३) वरील दोन्ही
४) यापैकी नाही
१४) ना. गोखले यांनी तीन प्रकारच्या प्राथमिक सेवांचा पुरस्कार सातत्याने केला,त्यात कशाचा समावेश नव्हता ?
१) सार्वत्रिक शिक्षण
२) नशाबंदी
३) स्वच्छता (आरोग्य)
४) अन्न व निवारा
१५) जोड्या जुळवा.
a) राजारामशास्त्री भागवत i) मराठा स्कूलचे संस्थापक
b) नरहर बाळकृष्ण जोशी ii) उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास कर्वेंनी ह्यांना मदत केली.
c) रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे iii) कर्वेचे वर्ग मित्र आणि खूप जवळचे मित्र
d) गोपाळ कृष्ण गोखले iv) कर्वेंना फर्ग्युसन कॉलेज मध्ये गणित शिकविण्यासाठी बोलविले
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (i) (iii) (ii) (iv)
४) (ii) (iv) (i) (iii)
१६) “समाजकल्याणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तर्कशुद्ध तत्त्वांवर आधारलेली वित्त व्यवस्था व सरकारी अनुदान आवश्यक आहे,” असे कोणाचे ठाम मत होते ?
१) दादाभाई नौरोजी
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) महात्मा गांधी
४) रोमेश चंद्र दत्त
१७) राष्ट्रीय काँगे्रसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता?
a) गोपाळ कृष्ण गोखले
b) गंगारामभाऊ मस्के
c) गोपाळ गणेश आगरकर
d) फिरोजशहा मेहता
पर्यायी उत्तरे :
१) (a) व (b) बरोबर
२) (b) व (c) चूक
३) (a), (b) आणि (d) बरोबर
४) (a), (b), (c) (d)
१८) १९०३ साली ना. गोखले यांनी केंद्रीय कायदेमंडळात अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणात कोणती संकल्पना स्पष्टपणे मांडली ?
१) आर्थिक पायाभूत सेवा व सामाजिक सेवा यातील फरक
२) कल्याणकारी राज्य
३) दारूचा उपभोग वाढल्यामुळेच केंद्रीय महसूल १०० टक्क्यांनी वाढला.
४) आर्थिक विकास हे लोककल्याणाचे साधन आहे.
१९) जोड्या जुळवा :
a) ए. ओ. ह्यूम i) भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस
b) दिनशा वाच्छा ii) भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव
c) गोपाळ कृष्ण गोखले iii) भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव
d) दाजी आबाजी खरे iv) भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (ii) (i) (iv) (iii)
२०) १८९० मध्ये ........... हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले ?
१) महादेव गोविंद रानडे
२) गणेश वासुदेव जोशी
३) विश्ववनाथ नारायण मंडलीक
४) गोपाळ कृष्ण गोखले
२१) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (अर्थतज्ञ) स्तंभ ब (धोरण)
अ. जॉन मेनार्ड केन्स I. जनरल थिअरी
ब. विल्यम बिव्हरिज II. १९४२ - कल्याणकारी राज्याची संकल्पना इंग्लंडमध्ये मांडली.
क. न्या. म. गो. रानडे III. रिकार्डो यांच्या मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणाला आव्हान
ड. गोपाळ कृष्ण गोखले IV. १९०३ - अर्थसंकल्पावर केंद्रीय कायदेमंडळात केलेल्या भाषणात कल्याणकारी राज्य संकल्पना मांडली.
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III IV I
2) IV I III II
3) I II III IV
4) I II IV I
२२) १९०२ मध्ये इंपिरीयल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले?
१) गोपाळ कृष्ण गोखले
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) महात्मा गांधीजी
४) लोकमान्य टिळक
२३) ब्रिटिश काळात ....... यांचे अंकगणित हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते आणि ज्यांनी या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती ?
१) बाळ गंगाधर टिळक
२) धों. के. कर्वे
३) गोपाळ कृष्ण गोखले
४) रँग्लर ना. वा. टिळक
२४) अॅगडम स्मिथ आणि रिकार्डो यांच्या आर्थिक धोरणासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य व अनिर्बंध स्पर्धा या दोन गोष्टींमुळे आर्थिक विकास होतो.
ब) वरील धोरणामुळे जास्तीत जास्त माणसांना जास्तीत जास्त सुख मिळू शकते.
क) सरकारने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केल्यास या भांडवली अर्थव्यवस्थेचा डोलारा ढासळतो.
ड) मुक्त अर्थव्यवस्था आणि कमीत कमी सरकारी हस्तक्षेप हे अर्थव्यवस्थेस परस्पर पूरक असतात.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, ब, क आणि ड बरोबर
२५) १९३० च्या दशकातील जागतिक मंदीनंतर जॉन मेनार्ड केन्स यांच्या जनरल थिअरी या पुस्तकातील विचारमांडणीमुळे कोणत्या सिद्धांताला पहिला धक्का बसला ?
१) न्या. म. गो. रानडे यांच्या आर्थिक राष्ट्रवाद सिद्धांताला
२) रिकार्डो यांच्या मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताला
३) अॅकडम स्मिथ यांच्या आर्थिक सिद्धांताला
४) वरील सर्व
२६) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : रिकार्डोच्या सिद्धांताच्या आधारे ब्रिटिश सरकारने भारतातील त्यांचे धोरण आखले होते.
कारण (र) : मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापारामुळेच जगातील सर्व देशांचा विकास होईल व सर्वांचे कल्याण होईल, असा रिकार्डो यांचा सिद्धांत होता.
पर्यायी उत्तरे :
१) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
२) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
३) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
४) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
२७) “भांडवलशाही व्यवस्था सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वत:च्या बळावर तग धरू शकत नाही,” हे कोणी सिद्ध केले?
१) दादाभाई नौरोजी
२) अॅदडम स्मिथ आणि रिकार्डो
३) जॉन मेनार्ड केन्स
४) गोपाळ कृष्ण गोखले
२८) जोड्या जुळवा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने -
स्थळ व वर्षे अध्यक्ष
a) कलकत्ता (१८८६) i) अॅानी बेझंट
b) अलाहाबाद (१८८८) ii) दादाभाई नौरोजी
c) वाराणसी (१९०५) iii) जॉर्ज युल
d) कलकत्ता (१९१७) iv) गोपाळकृष्ण गोखले
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (iv) (iii) (ii)
२) (ii) (iii) (iv) (i)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (iii) (ii) (i)
२९) गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावरून सुरू झाला.
२) इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
३) आगरकरांच्या शिफारशीमुळे त्यांना पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व मिळाले.
४) त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले.
३०) पुढील वाक्यात वर्णन केलेली व्यक्ती ओळखा.
अ) समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते आणि या बाबतीत ते आगरकरांच्या जवळचे होते.
ब) १९०३ मध्ये धारवाड येथे झालेल्या सामाजिक परिषदेत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या उन्नतीसाठी प्रस्ताव मांडून डिप्रेस्ड क्लासची बाजू घेतली.
पर्यायी उत्तरे :
१) न्यायमूर्ती रानडे
२) गो. कृ. गोखले
३) विठ्ठल रामजी शिंदे
४) बाळ गंगाधर टिळक
३१) गोपाळ कृष्ण गोखलेंनी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जाहीर केले होते की, वसाहतीचे स्वराज्य मिळविणे हे काँग्रेसचे ध्येय राहील?
१) सुरत, १९०७
२) वाराणशी, १९०५
३) कलकत्ता, १९०६
४) मुंबई, १९१५
३२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या २१ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
१) वल्लभभाई पटेल
२) जवाहरलाल नेहरू
३) गोपाळ कृष्ण गोखले
४) लाला लजपतराय
३३) ........ यांनी आपल्या आर्थिक राष्ट्रवादाची मांडणी करताना रिकार्डो यांच्या मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणाला आव्हान दिले?
१) आर. सी. दत्त
२) महादेव गोविंद रानडे
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) गोपाळ कृष्ण गोखले
३४) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कोठे झाला ?
१) सातारा जिल्ह्यातील कागल येथे
२) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे
३) कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे
४) रत्नागिरी जिल्ह्यातील कोतलूक
३५) भारत सेवक समाजाची स्थापना नामदार गोखले यांनी कोणत्या साली केली?
१) १९१९
२) १९०५
३) १९०६
४) १९०४
३६) भारत सेवक समाज या संस्थेशी खालीलपैकी कोण संबंधित होते?
a) गोपाळ कृष्ण गोखले
b) श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंझरू
c) ठक्करबप्पा, ना. भ. जोशी, काकासाहेब लिमये
d) डॉ. भांडारकर, गंगाराम भाऊ मस्के
पर्यायी उत्तरे :
१) (a), (c) आणि (d) फक्त
२) (a), (b) आणि (c) फक्त
३) (b), (c) आणि (d) फक्त
४) (a), (b) आणि (d) फक्त
३७) ....... यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
१) गोपाळ गणेश आगरकर
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) महात्मा जोतिबा फुले
४) लाल लजपतराय
३८) जोड्या जुळवा :
अ) जगन्नाथ शंकर शेठ I. ईस्ट इंडिया असोसिएशन
ब) दादाभाई नौरोजी II. भारत सेवक समाज
क) गणेश वासुदेव जोशी III. बॉम्बे असोसिएशन
ड) गोपाल कृष्ण गोखले IV. पुणे सार्वजनिक सभा
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) I III II IV
२) III I IV II
३) IV II I III
४) III I II IV
३९) भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते ?
१) दादाभाई नौरोजी
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) महात्मा गांधी
४) बिपिन चंद्र पाल
४०) न्यायमूर्ती रानड्यांचा आर्थिक राष्ट्रवाद पुढील कोणत्या गोष्टींत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरून दिसून येतो?
a) वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणोत्तेजक मंडळी.
b) औद्योगिक प्रदर्शन.
c) औद्योगिक परिषद.
d) पश्चिगम भारताची औद्योगिक मंडळी.
पर्यायी उत्तरे :
१) (b), (c) आणि (d)
२) (a), (b) आणि (c)
३) (a), (b) आणि (d)
४) (a), (c) आणि (d)
४१) भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी १९ मार्च १९१० रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला ?
१) महात्मा फुले
२) महादेव गोविंद रानडे
३) लॉर्ड मेकॉले
४) गोपाळ कृष्ण गोखले
४२) पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ?
अ) भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकार्यांजचे पगार व निवृत्ती वेतन.
ब) भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा.
क) ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.
ड) हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ,क आणि ड
२) फक्त अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) फक्त ब,क आणि ड
४३) नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार कशातून प्रतीत होतात ?
१) भारत सेवक समाज
२) भारत जनता समाज
३) भारत समता समाज
४) भारत एकता समाज
४४) खालील विधाने विचारात घ्या:
a) नामदार गोखले यांना व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले होते.
b) त्यासाठी त्यांची म्पिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल सरकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) व (b) दोन्ही
४) दोन्हीही नाहीत
४५) ...... हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
१) अरविंद घोष
२) गोपाल कृष्ण गोखले
३) बाळ गंगाधर टिळक
४) बिपिनचंद्र पाल
४६) गोपाळ कृष्ण गोखले यांचा इंग्रजांची न्यायबुद्धी, उदारता व निष्पक्षपातीपणावर विश्वास होता, कारण ...
अ) इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था अस्तित्वात नव्हती.
ब) इंग्रजांच्या आगमनानंतर सनदशीर मार्गाने ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली.
क) गोपाळ कृष्ण गोखले यांच्या राजकीय उदारमतवादी विचारात हिंसेला कोणतेही स्थान नव्हते.
ड) भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
४७) “बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते ?
१) महादेव गोविंद रानडे
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) फिरोेझशहा मेहता
४) दादाभाई नौरोेजी
४८) मवाळांनी काय मागितले नाही?
A) जमिनीवरील कर कमी करणे, मिठावरील कर माफ करणे.
B) सावकारांच्या जुलमांपासून संरक्षण.
C) इंग्रजांना उच्च पदांवर नेमणूक न देणे.
पर्यायी उत्तरे :
१) केवल (B)
२) केवल (C)
३) (B) व (C)
४) एकही पर्याय योग्य नाही
४९) काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधिसाधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी अशी टिका केली जात असे?
१) महाराष्ट्रीयन
२) बंगाली
३) जहाज
४) मवाळ
५०) इंग्रजी राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मवाळवादी नेत्यांना का वाटू लागले ?
१) प्रांता-प्रांतांमध्ये व अनेक संस्थानांमध्ये विभागल्या गेलेला देश ब्रिटिशांनी एक केले.
२) ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या.
३) ब्रिटिशांनी शेती व्यवसायात प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला.
४) इंग्रजांनी भारतात औद्योगिक प्रगती साध्य केली.
५१) भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल ?
१) मवाळांच्या आवेदनांबाबत ब्रिटिशांची थोडेसे द्यावयाचे व बहुतांशी नाकारावयाचे अशी नीती होती.
२) मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती.
३) ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनआधार नव्हता.
४) वरील एकही विधान अयोग्य नाही.
५२) ब्रिटिश शासनाकडे मवाळांनी कोणत्या मागण्या मागितल्या होत्या?
(A) शेतसार्याात वाढ करावी.
(B) सरकारने शेतकर्यांाना कमी दराने कर्ज द्यावे.
(C) मिठावरील कर सरकारने वाढवावा.
(D) प्रचलित कर व्यवस्थेत बदल करावा.
पर्यायी उत्तरे :
१) (A) आणि (B) चूक
२) (B) आणि (C) बरोबर
३) (C) आणि (A) चूक
४) (C) आणि (D) बरोबर
५३) गोपाळ कृष्ण गोखले कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
१) डेक्कन कॉलेज
२) फर्ग्युसन कॉलेज
३) वाडिया कॉलेज
४) यापैकी नाही
५४) सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या या मागण्या होत्या?
अ) भारतीयांना सरकारी नोकर्यारत घ्यावे
ब) शेतकर्यांावरचे कर कमी करावेत
क) भारतीयांचे दारिद्य्र दूर करावे
ड) भारतीयांची पिळवणूक करणे थांबवावे
पर्यायी उत्तरे :
१) (अ), (ब), (क), (ड)
२) फक्त (अ) आणि (ड)
३) फक्त (ब) आणि (क)
४) फक्त (अ) आणि (क)
५५) भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोणी म्हटले?
१) दादाभाई नौरोजी
२) अॅदडम स्मिथ
३) लोकमान्य टिळक
४) ब्रॅड लॉ
५६) आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी २० व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला :
१) अर्ज विनंत्यांच्या राजकारणाद्वारे
२) घटनात्मक साधनांद्वारे
३) आंदोलनात्मक मार्गाद्वारे
४) वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे
५७) खालीलपैकी कोणते बिन्दू होम चार्ज मधील नव्हते, होम चार्ज अर्थात एकोणिसाव्या शतकातील दुसर्या भागात झालेल्या भारतापासून इंग्लंड कडे धनाच्या प्रवाहासंबंधी घटना ?
१) भारतापासून इंग्लंडला कॉटन आणि सिल्क वस्त्रांचा निर्यात
२) भारतात कार्यालय स्थापना संबंधी खर्च
३) रेल्वेच्या भांडवली निवेश संबंधी व्याज
४) सैन्य स्टोअर्स खरेदी
५८) भारतातील ब्रिटिशांच्या वसाहती राजवटी दरम्यान जे भारताचे आर्थिक शोषण झाले त्यामध्ये होम चार्जेस हा घटक महत्त्वाचा होता. यामध्ये समाविष्ट असलेला निधी कोणता?
अ) लंडन मधील इंडिया ऑफिस चालवण्यासाठी वापरला गेलेला निधी.
ब) भारतातील ब्रिटिश अधिकार्यां्चे पगार, पेन्शन यासाठी वापरलेला निधी.
क) भारताच्या बाहेर ब्रिटिशांनी केलेल्या युद्धासाठी वापरलेला निधी.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ बरोबर
२) फक्त अ आणि ब बरोबर
३) ब व क बरोबर
४) अ, ब आणि क
५९) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कोठे झाला ?
१) सातारा जिल्ह्यातील कागल येथे
२) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे
३) कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे
४) रत्नागिरी जिल्ह्यातील कोतलूक
६०) मवाळांचा नेता कोण होता?
१) टिळक
२) गोखले
३) आगरकर
४) रानडे
६१) नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स नावाची संस्था कोठे कार्यरत आहे.
१) दर्बान शहरात
२) मुंबई शहरात
३) नागपूर शहरात
४) पुणे शहरात
उत्तरे : प्रश्नवमंजुषा (१२७)
१-४
२-४
३-३
४-३
५-४
६-३
७-३
८-३
९-२
१०-४
११-१
१२-२
१३-१
१४-४
१५-३
१६-२
१७-४
१८-२
१९-१
२०-४
२१-३
२२-१
२३-३
२४-४
२५-२
२६-२
२७-३
२८-२
२९-३
३०-२
३१-२
३२-३
३३-२
३४-४
३५-२
३६-२
३७-२
३८-२
३९-२
४०-१
४१-४
४२-३
४३-१
४४-३
४५-२
४६-३
४७-२
४८-४
४९-४
५०-१
५१-४
५२-३
५३-२
५४-१
५५-२
५६-४
५७-१
५८-२
५९-४
६०-२
६१-४