१ मे : कामगार दिन / प्रश्नमंजुषा (१२५)

  • १ मे : कामगार दिन / प्रश्नमंजुषा (१२५)

    १ मे : कामगार दिन / प्रश्नमंजुषा (१२५)

    • 04 May 2021
    • Posted By : study circle
    • 2043 Views
    • 2 Shares

    प्रश्नमंजुषा (१२५)

    १) मजुरी शोषण सिद्धांत कोणी मांडला ज्याला अतिरिक्त मूल्य सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते ?
    १) अॅ डम स्मिथ
    २) जोसेफ शुंपीटर 
    ३) कार्ल मार्क्स 
    ४) डेव्हिड रिकोर्डो 
     
    २) कामगारांचे मानसिक धैर्य आणि व्यवस्थापनामध्ये मानवी घटकाला महत्त्व देणे यावर पहिला प्रयोग ......... यांनी केला.
    १) जे.आर.डी.टाटा
    २) जमशेदजी टाटा
    ३) रॉबर्ट ओवेन
    ४) एफ.डब्लू. टेलर
     
    ३) कामगार नेतृत्वाचा ‘जीवनचक्र सिद्धांत’ कोणी मांडला ?
    १) रेड्डीन
    २) फीडलर
    ३) हर्से आणि ब्लँचर्ड
    ४) जॉली
     
    ४) ........... हे त्यांच्या मानवी यत्नांच्या टप्प्यांच्या सिद्धान्ताविषयी प्रसिद्ध आहेत.
    १) फ्रेडरिक हर्झनबर्ग
    २) पीटर ड्रकर
    ३) जॉन गारनेट
    ४) अब्राहम मासलो
     
    ५) शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाची संकल्पना औद्योगिक कामासाठी वापरण्यास कोणी सुरुवात केली ?
    १) इल्टन माओ
    २) एम.एल.टेलर
    ३) एफ.डब्ल्यू.टेलर
    ४) डी.सी.मिलर
     
    ६) श्रमिक शक्तीची तुलना ........ करता येते.
    a) उद्योगात काम करणार्याय केवळ संघटित मजुरांशी
    b) आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या लोकसंख्येशी
    c) वस्तू आणि सेवा यांच्या अर्थोत्पादनात सहभागी व्यक्तींशी
    d) केवळ अनौपचारिक क्षेत्रात काम करणार्यास असंघटित कामगारांशी
    पर्यायी उत्तरे -
    १) (a) फक्त (d) फक्त
    २) (a) आणि (b) फक्त
    ३) (a) आणि (c)
    ४) (b) आणि (c)
     
    ७) गेल्या दोन दशकांत सार्वजनिक उद्योगातील रोजगार कमी होत आहेत कारण ...........
    १) परदेशी गुंतवणुकीची कमतरता
    २) सार्वजनिक उद्योगातील निर्गुंतवणूक 
    ३) स्पर्धा
    ४) भांडवलाची कमतरता
     
    ८) आधुनिक भारतातील कामगार हा कोणत्या क्षेत्रात वाढत आहे ?
    १) संघटित क्षेत्र
    २) असंघटित क्षेत्र
    ३) कारखानदारी क्षेत्र
    ४) बिझनेस प्रोसेसिंग संस्था (कॉल सेंटर)
     
    ९) खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
    a) यांत्रिक पर्यावरणामध्ये यंत्रांचा विकास व परिणामस्वरूप औद्योगिक प्रक्रियांचा अंतर्भाव होतो.
    b) असमाधानकारक यांत्रिक पर्यावरण औद्योगिक थकवा, कंटाळवाणेपणा, वैफल्य व अपघात अशा प्रश्नांना जन्माला घालते.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) योग्य आहे.
    २) फक्त (b) योग्य आहे.
    ३) दोन्ही (a) व (b) योग्य आहे.
    ४) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
     
    १०) ‘कर्मचार्यांलच्या मानसिक धैर्यामुळे’ कोणता चांगला परिणाम दिसून येतो ?
    १) उच्च उत्पादन
    २) उच्च नफा
    ३) चांगले वेतन
    ४) कामाचे समाधान
     
    ११) कामामधील सक्रिय सहभाग हा प्रकार ......... शी संबंधित आहे.
    १) दृष्टिकोन
    २) मूल्ये
    ३) विश्वाकस
    ४) भावना
     
    १२) खालीलपैकी कोणता महत्त्वाचा स्रोत कामाच्या ठिकाणी तणाव देणारा आहे ?
    १) करिअर विकास
    २) प्रशिक्षण
    ३) सहकारी 
    ४) मूल्यमापन
     
    १३) खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय हा औद्योगिक नोकरशाहीचे रचनात्मक वैशिष्ट्य नाही ?
    १) लाइन व स्टाफ संघटन
    २) औद्योगिक नोकरशाहीची रचनात्मक भूमिका 
    ३) अधिकार व्यवस्था
    ४) अनौपचारिक सामाजिक संबंध 
     
    १४) कामगार नोकरशाही पद्धतीत ...
    १) अधिकार साखळी पद्धतीने दिलेले असतात
    २) निर्णय भावनात्मक रित्या घेतले जातात  
    ३) निर्णय राजकीय विचार भारीत असतात. 
    ४)  यांपैकी कोणतेही  नाही
     
    १५) कामगार व्यवस्थापनाच्या वर्तनवादी दृष्टिकोनानुसार, ‘स्थिती’ यामध्ये .......... चा समावेश होतो.
    १) शरीरविज्ञानशास्त्रविषयक, आकलनविषयक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया
    २) तात्काळ उत्तेजन आणि भोवतालची परिस्थिती
    ३) वर्तनविषयक प्रतिसाद
    ४) समाजकेंद्रित मूल्ये
     
    १६) कामगारांचे संघटनात्मक वर्तणुकीचे प्रकटीकरण ........ शी संबंधित आहे.
    १) संघटनात्मक संरचना, व्यवस्थापन प्रक्रिया आणि तंत्रज्ञान
    २) जीवशास्त्रीय, शरीरविज्ञानशास्त्रविषयक संरचना आणि व्यक्तिमत्त्व
    ३) संघटनात्मक गतिमानता, संघर्ष बदल, आणि जुळवणूक
    ४) उत्पादकता, तंत्रज्ञान व व्यक्तिमत्त्व
     
    १७) कामगार व्यवस्थापनाच्या थियरी-एक्स पासून मिळालेले संघटनेचे प्रमुख तत्त्व म्हणजे 
    १) अंतर्भूत घटक
    २) ध्येय
    ३) निर्देश व नियंत्रण
    ४) यांपैकी नाही
     
    १८) कामगार व्यवस्थापनाच्या थियरी-वाय पासून मिळवलेले संघटनेचे प्रमुख तत्त्व म्हणजे 
    १) निर्देश 
    २) अंतर्भूत घटक
    ३) नियंत्रण
    ४) ध्येय
     
    १९) कामगार व्यवस्थापनाच्या हर्जबर्ग यांच्या दोन घटक असलेल्या सिद्धान्तामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आले ते म्हणजे .....
    १) प्रेरणा
    २) दृष्टिकोन
    ३) कामाचे समाधान
    ४) यांपैकी कोणतेही नाही
     
    २०) कामगार व्यवस्थापनाच्या ‘बँक वायरिंग रूम स्टडी’ या हॉथॉर्नच्या प्रयोगात दिसून आलेले कार्य हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने निश्चियत केले होते ?
    १) पर्यवेक्षणाचे स्वरूप
    २) मिळकत
    ३) अलिखित संहिता
    ४) पर्यवेक्षणाची गुणवत्ता
     
    २१) एका वेळी जेव्हा एकच स्पर्धक ध्येय साध्य करतो किंवा मिळवतो आणि तो विजेता म्हणून घोषित केला जातो त्याला ........ असे म्हणतात.
    १) निरपेक्ष स्पर्धा
    २) सापेक्ष स्पर्धा 
    ३) व्यक्तिगत स्पर्धा 
    ४) व्यक्तिनिरपेक्ष स्पर्धा 
     
    २२) कामाच्या ठिकाणी सामाजिक संबंध निश्चि त करण्यासाठी श्रम विभागणीची कशा प्रकारे मदत झाली ?
    १) लौकिक विशेषत:
    २) निर्माण प्रक्रिया
    ३) यांत्रिकीकरण
    ४) वैशिष्टीकरण 
     
    २३) महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी स्थलांतराचे ...... हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
    १) सामाजिक
    २) राजकीय
    ३) शैक्षणिक
    ४) आर्थिक
     
    २४) वास्तव वेतन म्हणजे ........... खरेदीशक्ती होय.
    १) पैशातील वेतनाची
    २) किमान वेतनाची
    ३) वैधानिक किमान वेतनाची
    ४) मालकांची 
     
    २५) किमान वेतन निश्चिकत करणे खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी आवश्यक समजले जाते?
    a) मजुरांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे.
    b) मजुरांचे शोषण होऊ नये म्हणून
    c) उद्योग व समाजात सलोखा, शांती प्रस्थापित होण्यासाठी
    d) मजुरांची कार्यक्षमता व कार्य-दक्षता वाढविण्यासाठी
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a)
    २) फक्त (b)
    ३) (b) आणि (c)
    ४) वरीलपैकी सर्व (a), (b), (c) आणि (d)
     
    २६) महागाई भत्त्याबाबत खालील दोन विधाने विचारात घ्यावी.
    a) केंद्र सरकारी कर्मचारी/निवृत्ती वेतनधारक यांना मिळणारा महागाई भत्ता दर वर्षी १ जुलै रोजी सुधारित होतो.
    b) अखेरचा जाहीर झालेला वाढीव भत्ता १०% वाढला असून तो १.७.२०१३ पासून ९०% झाला आहे.
    आता सांगा की : 
    १) (a) बरोबर (b) नाही
    २) (b) बरोबर (a) नाही
    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर
    ४) (a) आणि (b) दोन्ही बरोबर नाही 
     
    २७) एखादा कामगार बोनस मिळायला अपात्र ठरतो, जर तो खालील कारणास्तव कामावरून बडतर्फ केला असेल. 
      १) लबाडी
    २) धंद्याच्या जागेत दंगामस्ती/हिंसक वर्तन
    ३) धंद्याच्या मालमत्तेची चोरी/अफरातफर
    ४) वरीलपैकी कोणतेही
     
    २८) ‘आठवडा’ या संदर्भ काळाच्या आधारे एखादी व्यक्ती एका विशिष्ट आठवड्यात बेरोजगार आहे, हे कसे ठरविता येईल?
    १) आठवड्यातून एकही तास काम केलेले नाही परंतु ती व्यक्ती काम शोधते आहे किंवा कामासाठी उपलब्ध आहे.
    २) आठवड्यातून सात तास सुद्धा काम केलेले नाही परंतु ती व्यक्ती काम शोधते आहे किंवा कामासाठी  उपलब्ध आहे.
    ३) आठवड्यातून पाच तास सुद्धा काम केलेले नाही परंतु ती व्यक्ती काम शोधते आहे किंवा कामासाठी  उपलब्ध आहे. 
    ४) आठवड्यातून सहा तास सुद्धा काम केलेले नाही परंतु ती व्यक्ती काम शोधते आहे किंवा कामासाठी  उपलब्ध आहे.
     
    २९) ज्या विभागात सगळ्यात जास्त मुले काम करतात, त्यापासून ज्या विभागात सगळ्यात कमी मुले काम करतात, अशा विभागांची क्रमवारी लिहा.
    अ) शेती
    ब) व्यापार आणि उपाहारगृहे
    क) उत्पादन क्षेत्र
    ड) बांधकाम
    इ) वस्ती आणि सामाजिक सेवा
    योग्य पर्याय निवडा :
    १) अ, ब, क, इ, ड
    २) ब, क, इ, अ, ड
    ३) अ, इ, क, ड, ब
    ४) अ, ब, क, ड, इ
     
    ३०) मुस्लिमांमध्ये बालमजुरीचे प्रमाण धिम्या गतीने कमी होण्याचे/ची कारण/णे ः
    अ) पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेली असणे    
    ब) साक्षरतेची कमी पातळी    
    क) कुशल कारागिरांकरता मागणी
    योग्य पर्याय निवडा :
    १) अ, ब आणि क
    २) फक्त ब
    ३) फक्त क
    ४) फक्त अ
     
    ३१) पाकिस्तानातील गालिचे बनविण्याच्या कामासाठी ७ ते १० वर्षामधील मुलांना उत्तम कारागीर का समजलं जातं?
    a) ते कमी खातात.            
    b) ते आज्ञाधारक असतात. 
    c) त्यांना प्रौढ विणकरांपेक्षा खूप कमी पगार देऊन चालतं       
    d) त्यांच्या अंगी भरपूर कौशल्य असतं
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
    १) फक्त (a) आणि (b)
    २) फक्त (c) आणि (d)
    ३) फक्त (b) आणि (c)
    ४) फक्त (b), (c) आणि (d)
     
    ३२) कोणत्या एका माजी राष्ट्रपतीचा भारतातील कामगार चळवळीशी संबंध होता ?
    १) के. आर. नारायनन
    २) डॉ. झाकीर हुसेन
    ३) व्ही. व्ही. गिरी
    ४) आर. वेंकट रमन  
     
    ३३) ’अहमदाबाद मिल संप’ घटना ..... यांच्याशी संबंधित होती.
    १) सरदार पटेल
    २) मणीभाऊ देसाई
    ३) मो. क. गांधी
    ४) मोरारजी देसाई
     
    ३४) मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशिन आल्याने २२८ मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात....... नवी मशीन ही कामगार चळवळी पुढील मोठी समस्या आहे असे ‘सोशॅलिस्ट‘ मध्ये कोणी लिहीले ?
    १) ना. म. जोशी
    २) जॉर्ज फर्नांडीस
    ३) कॉमरेड रणदिवे
    ४) कॉमरेड डांगे  
     
    ३५) कोणत्या पक्षाने शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले?
    १) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसमधील डाव्या गटाने
    २) ट्रेड युनियन
    ३) राष्ट्रीय ट्रेड युनियन
    ४) कामगार पक्ष
     
    ३६) कष्टकर्यांषना माफक दरामध्ये सकस आहार देणारी ’कष्टाची भाकर’ योजना १९७५ साली कोणी सुरू केली?
    १) महाराष्ट्र शासन
    २) शोषित मुक्ती अभियान
    ३) हमाल पंचायत
    ४) निवारा हक्क परिषद
     
    ३७) १९२१ मधील मद्रास शहर चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ...... येथे चार महिने चाललेला संप होय.
    १) मद्रास बार काउन्सिल
    २) बकिंगहॅम अँड कर्नाटक टेक्स्टाइल मिल्स्
    ३) राजामुंद्री कापड बाजार
    ४) गुंटूर नगरपालिका
     
    ३८) ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन ..... येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
    १) लखनौ
    २) कानपूर
    ३) कोल्हापूर
    ४) पुणे
     
    ३९) महाराष्ट्रातील कामगार चळवळींची पीछेहाट होण्याची कारणे कोणती?
    अ) कामगारांचे दारिद्र्य
    ब) कामगार संघटना मधील स्पर्धा
    क) उद्योगपतींचे प्रतिकूल धोरण
    ड) शासनाचे चळवळीवरील नियंत्रण
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
    १) अ फक्त
    २) अ आणि ब फक्त
    ३) अ, ब आणि क
    ४) अ, ब आणि ड
     
    ४०) योग्य कथन ओळखा :
    a) जुलै, २००२ मध्ये राष्ट्रीय मच्छीमार संघटनेद्वारे (NEF) परकीय ट्रॉलर्सला सरकारने दिलेल्या परवान्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संप करण्याचे आव्हान करण्यात आले.
    b) आंध्र प्रदेशाच्या दुर्गम खेड्यातील ग्रामीण महिलांनी मद्यविरोधी, माफिया विरोधी, सरकार विरोधी केलेल्या संघर्षाला अर्क-विरोधी आंदोलन म्हटले गेले.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a)
    २) फक्त (b)
    ३) (a) आणि (b) दोन्ही
    ४) (a) आणि (b) दोन्हीही नाही
     
    ४१) जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना भारतातील कोणत्या ठिकाणी आहे?
    १) दिग्बोई
    २) मंगलोर
    ३) जामनगर
    ४) विशाखापट्टणम
     
    ४२) Noida या संस्थेचे पूर्ण नाव लिहा?
    १) नॉर्दन ओरिसा औद्योगिक विकास प्राधिकरण
    २) नवीन ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण
    ३) नवीन ओखला औद्योगिक विकास संस्था
    ४) नॉर्थ ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण
     
    ४३) डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे ?
    १) पुणे
    २) कोल्हापूर
    ३) अहमदनगर
    ४) नाशिक 
     
    ४४) व्ही.व्ही. गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
    १) कानपूर
    २) नोएडा
    ३) कोलकाता
    ४) मुंबई 
     
    ४५) बल्लारपूर कागद गिरणी ........... जिल्ह्यात आहे.
    १) नागपूर
    २) सोलापूर
    ३) चंद्रपूर
    ४) कोल्हापूर
     
    ४६) महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला ’हातमाग’ ...... येथे सुरू झाला.
    १) सातारा
    २) भिवंडी
    ३) इचलकरंजी
    ४) मुंबई
     
    ४७) ‘सारख्या कामासाठी समान वेतन’ अशी तरतूद भारतीय संविधानाच्या कलम .......... अन्वये आहे.
    १) कलम ३८
    २) कलम ३९
    ३) कलम १४
    ४) कलम १६
     
    ४८) जोड्या लावा. (मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा -UDHR)
                            A                                   B
    a) राष्ट्रीयतेचा अधिकार             i) अनुच्छेद २४
    b) संपत्तीचा अधिकार               ii) अनुच्छेद १५
    c) काम करण्याचा अधिकार       iii) अनुच्छेद २३
    d) विश्रांतीचा अधिकार              iv) अनुच्छेद १७
    (a) (b) (c) (d)
    १) (i) (ii) (iii) (iv)
    २) (ii) (iv) (iii) (i)
    ३) (ii) (iv) (i) (iii)
    ४) (iv) (iii) (ii) (i)
     
    ४९) जोड्या लावा - (मानवी हक्क आणि राज्य नीतीची मार्गदर्शक तत्त्वे) :
                 अ (मानवी हक्क)                              ब (मार्गदर्शक तत्त्वे - अनुच्छेद)
    a) काम करण्याचा अधिकार                                       i) अनुच्छेद ४७
    b) समान कामासाठी समान वेतन                               ii) अनुच्छेद ४१
    c) किमान राहणीमानाचा अधिकार                               iii) अनुच्छेद ४३ (A)
    d) उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग       iv) अनुच्छेद ३९
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (ii) (iii) (i)
    २) (ii) (iv) (i) (iii)
    ३) (iii) (iv) (ii) (i)
    ४) (ii) (i) (iv) (iii)
     
    ५०) घटनेचे कलम ४३ (c) :
    a) कामगाराला व्यवस्थापनातील सहभागाचा अधिकार
    b) आरोग्यदायी रोजगार मिळण्याचा अधिकार
    c) समान कामाला समान वेतन
    d) वाजवी वेतनाचा अधिकार
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b)
    २) (b) आणि (c)
    ३) (a) आणि (d)
    ४) (a) फक्त
     
    ५१) बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर ...... बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुचवले आहे.
    १) इच्छांच्या
    २) अवांच्छित परिस्थितीच्या (आकस्मिक आपत्ती)
    ३) जमातवादी दंग्यांच्या
    ४) जखमी सैनिकांच्या
     
    ५२) भारतीय राज्यघटनेअंतर्गत कामगार हा विषय ......... मध्ये समाविष्ट होतो 
    १) राज्य सुची
    २) केंद्र सुची
    ३) समवर्ती सुची
    ४) यांपैकी नाही 
     
    ५३) कामाचा अधिकार ...... यात स्पष्ट केला आहे.
    १) राज्याची मूलभूत तत्त्वे
    २) नागरिकांचे मूलभूत हक्क
    ३) राज्यांच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
    ४) जिल्हा न्यायालयाचे अधिकार क्षेत्र
     
    ५४) ले ऑफ आणि रिट्रेंचमेंट भरपाईची कायदेविषयक तरतूद .......... मध्ये केली आहे.
    १) कामगार नुकसानभरपाई कायदा, १९२३
    २) वेतन अधिदान कायदा, १९३६
    ३) औद्योगिक विवाद कायदा, १९४७    
    ४) कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी व इतर तरतुदीविषयक कायदा, १९५२
     
    ५५) जोड्या लावा.
    a) औद्योगिक विवाद कायदा                                                 i) १९८६
    b) महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा              ii) १९४७
    c) बाल कामगार (प्रतिबंध व नियमन कायदा)                          iii) २००५
    d) कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन कायदा)                      iv) १९७०
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (ii) (iii) (i) (iv)
    २) (i) (iv) (ii) (iii)
    ३) (ii) (iii) (iv) (i)
    ४) (iv) (iii) (ii) (i)
     
    ५६) महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रातील ’माथाडी हमाल’ व श्रमजीवी कामगार अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?
    १) १९८०
    २) १९८८
    ३) १९६९
    ४) २०१४
     
    ५७) कॉन्ट्रॅक्ट लेबर कायदा केव्हा लागू करण्यात आला ?
    १) १० फेब्रुवारी १९७०
    २) १० फेब्रुवारी १९७१
    ३) १ फेब्रुवारी १९६९
    ४) १ जानेवारी १९७१
     
    ५८) खालील कायदे व त्यांचे पारित होण्याचे वर्ष यांच्या जोड्या जुळवा :
    a) बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम             i) १९५६
    b) अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा                            ii) १९८६
    c) बालविवाह प्रतिबंधक कायदा                                    iii) २००५
    d) एन. सी. पी. सी. आर. कायदा                                   iv) २००६
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १)  (iii) (ii) (iv) (i)
    २)  (ii) (i) (iv) (iii)
      ३) (iv) (iii) (ii) (i)
    ४) (i) (ii) (iii) (iv)
     
    ५९) कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि इतर तरतुदी अधिनियम, १९५२ अंतर्गत कोणती योजना कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेमार्फत राबविली जात नाही ?
    १) कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, १९५२
    २) कर्मचारी डिपॉझीट-लिंकड विमा योजना, १९७६
    ३) कर्मचारी निवृत्ती वेतन योजना, १९९५
    ४) कर्मचारी नुकसान भरपाई योजना, १९९८
     
    ६०) दि पेमेंट ऑफ वेजेस अॅ क्ट, १९३६ अन्वये ‘वेतन-काळ’ .......... पेक्षा जास्त नसावा.
    १) ७ दिवस
    २) १० दिवस
    ३) १५ दिवस
    ४) एक महिना
     
    ६१) मुंबई औद्योगिक संबंध कायदा, १९४६ च्या कोणत्या कलमामध्ये ‘श्रमिक अधिकारी’ ह्या शब्दाची व्याख्या केलेली आहे ?
    १) कलम ३ (२२)
    २) कलम ३ (११)
    ३) कलम ३
    ४) कलम ७
     
    ६२) स्थायी आदेश कायदा १९४६ अंतर्गत कामगार ५०% दराने निर्वाह भत्ता घेण्यात पात्र आहेत ?
    १) पहिल्या ५० दिवसा साठी
    २) पहिल्या ७५ दिवसा साठी
    ३) पहिल्या ९० दिवसा साठी
    ४) पहिल्या १०० दिवसा साठी 
     
    ६३) किमान वेतन कायदा १९४८ अंतर्गत कोणत्या सेक्शन खाली सरकारच्या शेड्यूलमध्ये वाढ करण्यास अधिकार आहेत ?
    १) सेक्शन २२
    २) सेक्शन २४
    ३) सेक्शन २७
    ४) सेक्शन २९
     
    ६४) बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा, १९८६ अन्वये वयाची ......... वर्षे पूर्ण न केलेली व्यक्ती ही ‘बाल’ म्हटली जाते.
    १) ७ वर्षे
    २) १२ वर्षे
    ३) १४ वर्षे
    ४) १८ वर्षे
     
    ६५) कर्मचारी राज्य विमा कायदा हा ........... ची फलनिष्पत्ती आहे.
    १) अडारकर योजना
    २) गांधीवादी योजना
    ३) इला भट ची योजना
    ४) भांडारकर योजना
     
    ६६) वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन अॅ क्ट, १८२३ अंतर्गत .......... दुखापतीबद्दल नुकसान भरपाई मिळू शकते.
    १) मृत्यू
    २) कायमचे पूर्ण/अंशत: अपंगत्व
    ३) काही काळ पूर्ण/अंशत: अपंगत्व
    ४) वरीलपैकी सर्व
     
    ६७) बॉम्बे औद्योगिक संबंध कायदा, १९४६ मधील कलम ३(३) मध्ये कोणती व्याख्या दिलेली आहे ?
    १) लवादाविषयी कार्यपद्धती
    २) मान्यता प्राप्त सुची
    ३) मान्यता प्राप्त संघटना
    ४) लवादाचे हक्क
     
    ६८) मुंबई औद्योगिक संबंध कायदा कलम ७८ कशासंबंधी आहे ?
    १) श्रमिक न्यायालय
    २) उच्च न्यायालय
    ३) राज्यपालाचे हक्क
    ४) वरीलपैकी काहीही नाही
     
    ६९) जेव्हा एखाद्या सम संख्येच्या लवादाकडे विवाद निर्देशित करण्याकरिता करारनाम्यात तरतूद केली असेल तर अन्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबतही करारनाम्यात तरतूद असेल. ती अन्य व्यक्ती म्हणजे
    १) अतिरिक्त न्यायाधीश
    २) पंच (अंपायर)
    ३) तिसरा पंच
    ४) अतिरिक्त लवाद
     
    ७०) निवाडा याचा अर्थ
    १) फक्त कामगार न्यायालयांनी दिलेला निर्णय
    २) फक्त राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरणांनी दिलेला निर्णय
    ३) लवादानी दिलेला निवाडा
    ४) वरील पैकी सर्व
     
    ७१) दि बॉम्बे शॉप्स अॅाण्ड एस्टॅब्लिशमेंटस अॅनक्ट, १९४८ अन्वये खालील निर्बंधाची तरतूद आहे.
    १) स्त्री कामगारांना रात्री उशिरापर्यंत काम देणे
    २) स्त्री कामगारांना इतरांपेक्षा जास्त काम देणे.
    ३) स्त्री कामगारांना सुट्टीच्या दिवशी काम देणे.
    ४) वरीलपैकी सर्व
     
    ७२) पुढील कायद्यांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा :
    अ) किमान वेतन कायदा
    ब) औद्योगिक विवाद कायदा
    क) कर्मचारी भविष्यनिधी कायदा
    ड) मातृत्व हित कायदा
    १) ब,अ,क,ड
    २) क,अ,ब,ड
    ३) अ,ब,क,ड 
    ४) ड,क,ब,ब 

    ७३) कालक्रमानुसार क्रम लावा.
    a) असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा
    b) कर्मचारी राज्य विमा कायदा
    c) कॉन्ट्रॅक्ट कामगार नियमन व कॉन्ट्रॅक्ट पद्धती रद्द कायदा
    d) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (c), (b), (d)
    २) (a), (b), (d), (c)
    ३) (b), (a), (d), (c)
    ४) (b), (d), (c), (a)
     
    ७४) ESI कायदा १९४८ चे राज्य विमा महामंडळ, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते?
    १) परसोनेल, सार्वजनिक तक्रार निवारण आणि पेन्शन मंत्रालय.
    २) कामगार आणि रोजगार मंत्रालय.
    ३) वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय.       
    ४) सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
     
    ७५) दि एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स अॅाक्ट, १९४८ अन्वये .......... लाभाची तरतूद आहे.
    १) आजारीपणाबद्दलचा लाभ
    २) बाळंतपणाबद्दलचा लाभ
    ३) अपंगत्वाबद्दलचा लाभ
    ४) वरीलपैकी सर्व
     
    ७६) किमान वेतन कायदा १९४८ च्या अंतर्गत वेतनाच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट आहे ?
    १) निवासासाठी दिलेल्या घराची किंमत
    २) घरभाडे भत्ता
    ३) पाणी-इलेक्ट्रिसिटी (वीज) पुरवल्यास त्याची किंमत
    ४) प्रवास भत्ता
     
    ७७) किमान वेतन कायदा १९४८ अंतर्गत खालीलपैकी कोणत्या परिस्थितीवर किमान वेतन देणे अवलंबून असते?
    १) आस्थापनेला झालेला फायदा
    २) आस्थापनाची आर्थिक परिस्थिती
    ३) उद्योगाचा प्रकार आणि व्याप्ती
    ४) वरीलपैकी कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत देय.
     
    ७८) किमान वेतन कायदा अन्वये वेतनामध्ये ............ समाविष्ट आहे.
    १) घर भाडे भत्ता
    २) प्रवास भत्ता
    ३) ग्रॅच्युटी           
    ४) वरीलपैकी कोणतेही नाही.
     
    ७९) किमान वेतन कायदा, १९४८ संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
    a) या कायद्यात पुरुष व स्त्री यांच्यात भेदभाव नाही.
    b) बदलता महागाई भत्ता हा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित आहे.
    c) बदलता महागाई भत्ता वर्षातून तीन वेळा सुधारित केला जातो.
    योग्य पर्याय निवडा.
    १) (a) आणि (b)
    २) (b) आणि (c)
    ३) फक्त (a)
    ४) (a), (b) आणि (c)
     
    ८०) खालीलपैकी कोणते लाभ कामगार राज्य विमा कायदा-१९४८ खाली मिळतात?
    a) आजारपण लाभ, मातृत्व लाभ
    b) अक्षमता लाभ, अवलंबित्व लाभ
    c) कामगार आणि त्याच्यावर अवलंबून असणार्यांासाठी वैद्यकीय लाभ
    d) अंत्यसंस्कार लाभ
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (c)
    २) (b) आणि (d)
    ३) वरील सर्व (a), (b), (c) आणि (d)
    ४) (a), (b) आणि (c)
     
    ८१) कारखाने अधिनियम, १९४८ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
    a) आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण
    b) वेतन, मनोरंजन आणि गृहनिर्माण
    c) संघटना, टाळेबंदी आणि संप
    d) अनुचित कामगार प्रथा
    पर्यायी उत्तरे :
    १) (c) आणि (d)
    २) (a), (b) आणि (c)
    ३) फक्त (a)
    ४) फक्त (b)
     
    ८२) मातृत्व लाभाविषयी कायदा, १९६१ अन्वये कोणते लाभ स्त्री कामगारांना उपलब्ध आहेत.
    १) मातृत्व लाभ
    २) मेडिकल बोनस
    ३) रजा व स्तनपान मध्यंतर
    ४) वरीलपैकी सर्व 
     
    ८३) दि काँट्रॅक्ट लेबर (अॅणबॉलिशन व रेग्युलेशन) अॅीक्ट, १९७० चे उद्दिष्ट
    १) कंत्राटी कामगारांचे नियमन करणे.
    २) कंत्राटी कामगार पद्धत बंद करणे.
    ३) काही विशिष्ट परिस्थितीत कंत्राटी कामगार पद्धत बंद करणे । नियमन करणे
    ४) वरीलपैकी कोणतेही नाही.
     
    ८४) खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
    a) कंत्राटी कामगार (नियंत्रण आणि निर्मूलन) कायदा त्या घटकांना लागू आहे ज्यात ३० किंवा अधिक  कामगार आहेत.
    b) कंत्राटी कामगार कायदा त्या घटकांना लागू नाही ज्यात काम अधून मधून किंवा हंगामी स्वरूपाचे असते.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) 
    २) फक्त (b) 
    ३) दोन्ही नाही
    ४) दोन्ही
     
    ८५) बालकामगारांना प्रतिबंधित ............ अन्वये केले आहे.
    १) बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा, १९८६
    २) दि अॅाप्रिन्टिसेस अॅधक्ट, १९६१
    ३) दि फॅक्टरीज अॅ्क्ट, १९४८
    ४) वरीलपैकी सर्व
     
    ८६) बालमजुरी (प्रतिबंध आणि नियमन) कायदा १९८६ यामध्ये २०१५ साली दुरुस्ती करण्यात आली. त्यात १४ ते १८ वर्षे या नव्या वयोगटाचा समावेश करण्यात आला आहे. या गटाच्या हितासाठी खालीलपैकी कोणता निर्बंध या कायद्यानुसार घालण्यात आला आहे?
    १) यांना घातक उद्योगात नोकरी दिली जाऊ नये.
    २) यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जाऊ नये.
    ३) यांना नोकरीवर ठेवल्यास, मजुरी किंवा पगार दिला जाऊ नये, मात्र सक्तीचे शिक्षण दिले जावे.
    ४) यांना मनोरंजन क्षेत्रात काम दिले जाऊ नये.
     
    ८७) बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ ने कोणत्या गोष्टींना मज्जाव केला?
    a) रात्री ७ ते सकाळी ८ या वेळेत काम
    b) अतिरिक्त वेळ काम (ओव्हर टाईम)
    c) ३ तासांपेक्षा जास्त वेळ काम
    d) विश्रांतीकरिता १ तास सुटीचा अंतराळ
    पर्यायी उत्तरे :
    १) सर्व
    २) (d) वगळता सर्व
    ३) (a) आणि (b)
    ४) (a), (b) आणि (d)
     
    ८८) खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा :
    a) ’बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ मध्ये सुधारणा करणारे विधेयक जुलै २०१६ मध्ये राज्यसभेत संमत झाले.
    b) १४ वर्षाखालील मुलांना कोणत्याही उद्योग आस्थापनात काम करण्यास मनाई आहे.
    c) गुन्हेगारास ६ महिने ते २ वर्षेपर्यंत कारावास किंवा रु. २०,००० ते ५०,००० पर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील.
    d) १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश होतो.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) विधान योग्य आहे
    २) (b) विधान योग्य आहे
    ३) (a), (b), (d) विधाने योग्य आहेत
    ४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत
     
    ८९) बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियम) सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत ः
    a) १४ वर्षांखालील बालकांस सर्व उद्योग आणि प्रक्रिया केंद्रांमध्ये कोणतेही काम करण्यास प्रतिबंध आहे.
    b) १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रणालीमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा
    c) या गुन्ह्यासाठी मालकास ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा रु. २० ते ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही.
    d) गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल.
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत?
    १) फक्त (b)
    २) फक्त (c)
    ३) वरीलपैकी नाही 
    ४) फक्त (d)
     
    ९०) भारत सरकारच्या पहिल्या शेतमजूर चौकशी समितीचा कार्यकाल कोठला होता ?
    १) १९५६-५७
    २) १९५२-५३
    ३) १९५०-५१
    ४) १९५८-५९
     
    ९१) १५ व्या (१९५७) भारतीय श्रम परिषदेमध्ये प्रमाणित कामगार कुटुंबामध्ये .......... उपभोग्य एककांचा समावेश एका कमवत्या व्यक्तीचे किमान वेतन ठरविताना करावा असे स्वीकारले.
    १) दोन
    २) तीन
    ३) चार
    ४) पाच
     
    ९२) ‘बॉम्बे मिल हँडस असोसिएशन’ चे संस्थापक कोण होते ?
    १) डॉ. बी.आर.आंबेडकर
    २) नारायण मेघाजी लोखंडे
    ३) बी.पी. वाडिया
    ४) एन..एम..जोशी
     
    ९३) समाजातील वाईट गोष्टी टाळण्यासाठी कामगार कल्याण अधिकाराची गरज असल्याचे सुचविले ?
    १) रेगे कमिटी
    २) कारखाने कायदा १९३४
    ३) व्हिटले कमिशन
    ४) ट्रेड युनियन अॅोक्ट १९२६
     
    ९४) पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य १९१७ च्या सॅडलर आयोगात होते?
    a) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
    b) दादाभाई नौरोजी
    c) आशुतोष मुखर्जी
    d) झियाउद्दीन अहमद
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b) फक्त 
    २) (b) आणि (c) फक्त  
    ३) (c) आणि (d) फक्त 
    ४) (a) आणि (d) फक्त
     
    ९५) १९२० मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
    १) श्री. अ. डांगे 
    २) लाला लजपतराय   
    ३) व्ही. व्ही. गिरी 
    ४) ना. म. जोशी 
     
    ९६) कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबईत १९२० मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले?
    १) डब्ल्यू. सी. बॅनर्जी
    २) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
    ३) लाला लजपतराय
    ४) महात्मा गांधी
     
    ९७) पहिल्या राष्ट्रीय श्रम आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
    १) श्री.  जी. डी. एच. कोल
    २) श्री. व्हो. व्ही. गिरी
    ३) डॉ.  पी. बी. गजेंद्रगडकर
    ४) श्री. गुलझारीलाल नंदा
     
    ९८) कामगार अन्वेषण समितीला ...... म्हणून ओळखले जाते.
    १) जॉर्ज समिती (१९४६)
    २) गोरे समिती (१९५१)
    ३) रेगे समिती (१९४६)
    ४) पावलस समिती (१९४७)
     
    ९९) महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल?
    १) सेनापती बापट
    २) श्रीपाद डांगे
    ३) लालजी पेंडसे
    ४) अच्युत पटवर्धन
     
    १००) सन १९८५ मध्ये असंघटित क्षेत्रातील स्त्री कामगारांवर एक महत्त्वपूर्ण अभ्यास कोणी प्रसिद्ध केला?
    १) सुलभा ब्रम्हे
    २) निर्मला बॅनर्जी
    ३) लीला दुबे
    ४) बीना आगरवाल
     
    १०१) जोड्या जुळवा.
    a) एम. सिंगारवेलू           i) लेबर किसान गॅझेट
    b) गुलाम हुसेन              ii) इन्किलाब
    c) मुजफ्फर अहमद       iii) नवयुग
    d) श्रीपाद अमृत डांगे     iv) दि सोशॅलिस्ट
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (iii) (ii) (i)
    २) (ii) (i) (iv) (iii)
    ३) (iii) (ii) (i) (iv)
    ४) (i) (ii) (iii) (iv)
     
    १०२) ’सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ ही कामगार संघटना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत आहे?
    १) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
    २) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
    ३) समाजवादी पक्ष
    ४) भारतीय जनता पक्ष
     
    १०३) सूची अ व सूची ब मधील जोड्या जुळवा :
           सूची (अ)                                      सूची (ब)
    a) भारतीय जनता पक्ष              i)  इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस
    b) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस        ii) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
    c) भारतीय साम्यवादी पक्ष      iii) भारतीय कामगार सेना 
    d) शिवसेना                          iv) भारतीय मजदूर संघ 
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (iv) (i) (ii) (iii)
    २) (i) (iii) (iv) (ii)
    ३) (ii) (iv) (iii) (i)
    ४) (iii) (ii) (i) (iv)
     
    १०४) महाराष्ट्रातील एस. टी. कामगारांचे हितसंबंध पाहणारा दबावगट म्हणून खालील संघाकडे पाहिले जाते.
    १) कामगार युनियन 
    २) लाल बावटा  
    ३) महाराष्ट्र मोटार कामगार-संघ
    ४) यापैकी नाही
     
    १०५) श्री. ना. म. जोशी .......... या संघटनेचे अध्यक्ष होते.
    १) बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन
    २) गिरणी कामगार युनियन
    ३) हिंद मजदूर सभा
    ४) भारतीय मजदूर संघ 
     
    १०६) कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची सांस्कृतिक आघाडी असणार्या. संस्थेचे नाव सांगा, ज्यामध्ये बलराज साहनी, कैफी आझमी हे सदस्य होते.
    १) इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन
    २) प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन
    ३) पृथ्वी थिएटर्स
    ४) थिएटर अकादमी
     
    १०७) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर पुढीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना संलग्न आहे ?
    १) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
    २) ऑल इंडिया स्टूडंटस फेडरेशन
    ३) नॅशनल स्टूडंटस युनियन ऑफ इंडिया
    ४) प्रोग्रेसिव्ह स्टूडंटस युनियन
     
    १०८) रॉबर्ट हॉक्सीचे सिद्धांताचे कामगार संघटनांच्या सिद्धांतांमध्ये काय योगदान आहे ?
    १) सामाजिक संबंध
    २) कार्य संबंधावर नियंत्रण
    ३) कार्यात्मक प्रकारच्या कामगार संघटनेच्या कल्पना 
    ४) कामगार संघटनांची क्रांती
     
    १०९) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक व कामगारांसंबंधीच्या विषयाशी सहभागी व सल्लामसलती साठी सरकार कशाच्या आधारे कामगार संघटनांना अधिकृत मान्यता देते. ?
    १) गुप्त मतदानाने
    २) सभासद पडताळणीने
    ३) कामगार संघटनांची कार्ये पाहून
    ४) यांपैकी कोणतेही नाही
     
    ११०) श्री. जी. डी. आंबेकर हे कोणत्या कामगार संघटनेशी संबंधित होते ?
    १) टेक्सटाईल लेबर असोसिएशन
    २) मिल मजदूर सभा
    ३) सर्व श्रमिक संघ
    ४) राष्ट्रीय मिल मजदूर संघ
     
    १११) खालील पर्यायांमधून भारतातील कामगार संघटनांचा पहिला राष्ट्रीय संघ ओळखा.
    १) आय.एन.टी.यू.सी.
    २) ए.आय.्टी.यू.सी.
    ३) बी.एम..एस..
    ४) एच.एम.एस.
     
    ११२) ‘इंडियन वर्कर’ हे साप्ताहिक जर्नल कोणत्या कामगार संघटनेने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली ?
    १) एच.एम.एस.
    २) बी.एम.एस.
    ३) ए.आय.टी.यू.सी.
    ४) इंटक
     
    ११३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
    a) एक कामगार संघटना म्हणून ‘सेवा’ (एस. इ. डब्ल्यू. ए.) या संस्थेशी नोंदणी १९८२ साली करण्यात आली.
          b) ही गरीब स्त्रियांची संघटना पूर्ण रोजगारीकरिता आहे.
    पर्यायी उत्तरे -
    १)  फक्त (a) 
    २) फक्त (b)  
    ३) दोन्ही नाही 
            ४) दोन्हीही
     
    ११४) ’सिटू’ ही कामगार संघटना १९७० ला भारतात कोणत्या उद्देशाने स्थापन झाली?
    अ) समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी
    ब) उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण न होऊ देण्यासाठी
    क) कामगारांच्या राहण्यात सुधारणा करणे
    ड) राजकीय आश्रय मिळविण्यासाठी
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
    १) ब आणि ड फक्त
    २) अ आणि क फक्त
    ३) ड फक्त
    ४) अ, ब आणि ड
     
    ११५) खालीलपैकी कोणत्या क्षेत्राची १९५०-५१ मध्ये प्रथम श्रमिक चौकशी करण्यात आली?
    a) चहा मळे श्रमिक
    b) शेती श्रमिक
    c) औद्योगिक श्रमिक
    d) दगडखाण श्रमिक
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (c)
    २) (c) आणि (d) 
    ३) फक्त (a) 
    ४) फक्त (b)
     
    ११६) खालीलपैकी कोणत्या केंद्रीय अकुशल कामगारांना संघटित करणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा घडवणार्याम कायद्यांकरिता दबाव गट निर्माण करणे, वेतन, सामाजिक सुरक्षेकरिता कार्य करणे अशा विविध कार्यात गुंतलेल्या असतात?
    a) BMS व INTUC - कामाच्या परिस्थितीत सुधार, त्याकरिता कायदेनिर्मितीकरीता दबाव गट निर्मिती कार्यात गुंतलेल्या असतात.
    b) CITU व AITUC - अकुशल कामगारांना संघटित करण्यात गुंतलेल्या असतात.
    c) HMS व BMS - वेतन व सामाजिक सुरक्षेसंबंधीच्या कार्यात गुंतलेल्या असतात.
    d) वरील सर्व केंद्रीय संघटना, वर नमूद केलेल्या विविध कार्यात गुंतलेल्या असतात.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a)
    २) (a) आणि (b)
    ३) (b) आणि (c)
    ४) फक्त (d)
     
    ११७) पुढील विधाने वाचा.
    a) भारतीय महिला राष्ट्रीय फेडरेशन (NFIW) ही संघटना भारतीय साम्यवादी मार्क्सवादी पक्षाशी संबंधित आहे.
    b) अखिल भारतीय लोकशाही महिला संघटना (AIDWA) ही संघटना भारतीय साम्यवादी पक्षाशी संबंधित आहे. 
    योग्य पर्याय निवडा. 
    १) (a), (b), दोन्ही विधाने योग्य आहेत.
    २) (a) विधान योग्य आहे.
    ३) (b) विधान योग्य आहे.
    ४) (a), (b) दोन्ही अयोग्य आहेत.
     
    ११८) खालीलपैकी कोणी सनदी सेवकांच्या संघावर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली  होती?
    १) पहिला वेतन आयोग
    २) तिसरा वेतन आयोग
    ३) गोरवाला अहवाल   
    ४) प्रशासकीय सुधारणा आयोग
     
    ११९) औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारने पहिल्या औद्योगिक धोरणाचा ठराव कोणत्या वर्षी स्वीकारला?
    १) १९५०
    २) १९४८
    ३) १९५२
    ४) १९५४
     
    १२०) केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
    १) १९६०
    २) १९५६
    ३) १९५८
    ४) १९६२
     
    १२१) राष्ट्रीय रोजगार क्षमता वृद्धी अभियानाची (NEEM) स्थापना ........ साली झाली.
    १) २०१७
    २) २०१४
    ३) २०००
    ४) १९९९
     
    १२२) औद्योगिक कामगाराची कामाच्या व राहण्याच्या ठिकाणची परिस्थिती सुधारण्यासाठी बाँबे, बंगाल व यू.पी. याचे पहिले कामगार कल्याण केंद्र कोणी सुरू केले ?
    १) ब्रिटिश गव्हर्नमेंट
    २) प्रोसीज्यूरल गव्हर्नमेंट
    ३) पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने
    ४) रॉयल कमिशन
     
    १२३) कोणती संस्था औद्योगिक आणि कृषी/ग्रामीण कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर करते ?
    १) सी.बी.डब्लू.ई.
    २) केंद्रीय श्रम सेवा
    ३) ई.पी.एफ.ओ.
    ४) लेबर ब्यूरो
     
    १२४) कोणत्या सरकारच्या कालखंडात ‘एक उद्योग एक संघटना‘ असे घोष वाक्य बनविले गेले?
    १) काँग्रेस सरकार
    २) जनता दल सरकार
    ३) राष्ट्रवादी काँग्रेस सरकार 
    ४) जनता पक्ष सरकार
     
    १२५) असंघटित क्षेत्रातील रोजगारासाठी ऑगस्ट २००७ मध्ये १३ कलमी कृती आराखडा कोणी सुचविला ? 
    १) आय.एल.ओ.
    २) एन.सी.ई.यु.एस.
    ३) एन.एस.एस.ओ.
    ४) सी.एस.ओ.
     
    १२६) ‘फेअर वेज कमिटीच्या मते फेअर वेजेस ( Fair Wages)  ची किमान मर्यादा ........ असली पाहिजे.
    १) किमान वेतन
    २) जीवन वेतन 
    ३) उच्च वेतन
    ४) यांपैकी नाही 
     
    १२७) कर्मचारी कपातीच्या समस्यांच्या अनुषंगाने भारत सरकारने १९९२ मध्ये एका निधी ची निर्मिती केली त्याला .......... असे म्हणतात.
    १) कपात निधी
    २) राष्ट्रीय सुरक्षा निधी 
    ३) राष्ट्रीय नूतनीकरण निधी 
    ४) राष्ट्रीय कल्याण निधी 
     
    १२८) ‘स्वयं सहाय्यता गट - बँक संलग्न कार्यक्रम’ हा फार मोठा सूक्ष्म वित्तपुरवठ्याचा कार्यक्रम कोणी राबविला आहे?
    १) आय.एस.सी.आय.
    २) आय.डी.बी.आय.
    ३) नाबार्ड
    ४) सिडबी
     
    १२९) भारतामध्ये आजारी औद्योगिक संस्थेच्या पुनर्वसनासाठी कोणती संस्था मदत करते ?
    १) भारतीय रिझर्व्ह बँक
    २) भारतीय औद्योगिक विकास बँक
    ३) भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ
    ४) औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळ
     
    १३०) मुख्य कामगार आयुक्तांच्या (केंद्रीय) संस्थेला .......... असेही ओळखले जाते.
    १) राष्ट्रीय संस्था (एन.ओ.)
    २) श्रम संस्था (एल..ओ.) 
    ३) सी.एस.ओ. 
    ४) मध्यवर्ती औद्योगिक संबंध यंत्रणा (सी.आय.आर.एम.) 
     
    १३१) पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
    a) पुरुषांच्या तुलनेत, असंघटित कामगार क्षेत्रातील स्त्रियांच्या प्रमाणाची टक्केवारी जास्त आहे.
    b) बाल कामगारांसबंधीचे राष्ट्रीय धोरण १९८१ साली रचले गेले.
    c) घरेलू कामगारांचा, ‘किमान वेतन कायदा, १९४८‘, मध्ये समावेश होतो.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (c)
    २) सर्व (a), (b) आणि (c) 
    ३) (a) आणि (b)
    ४) (b) आणि (c)
     
    १३२) १९९१ मध्ये समान वेतन संरचना लागू करून देशात वेतनासंबंधी तफावत कमी करण्यासाठी काय केले गेले?
    १) राष्ट्रीय कार्यस्थान स्तरावरील न्यूनतम वेतन (NFLMW)
    २) परिवर्तनशील महागाई भत्ता (VDA)
    ३) राष्ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती (NOS)
    ४) राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना (NPS)
     
    १३३) पूर्वीच्या कामगार हिताच्या योजनांपेक्षा मनरेगा ही महिलांसाठी अधिक अनुकूल अशी योजना म्हटली जाते कारणः
    १) एकूण कामगारांच्या किमान एक तृतीयांश कामगार महिला असाव्यात असे ही योजना नमूद करते.
    २) कामाच्या ठिकाणी बालसंगोपनाची सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध केली जाते.
    ३) अर्जदाराच्या रहिवासापासून पाच कि.मी. अंतराच्या आत या योजनेद्वारे कामाची उपलब्धता करून दिली जाते.
    ४) वरील सर्व
     
    १३४) खालील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
    a) भारतातील कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण दोन टप्प्यात झाले, पहिल्यांदा नॉन कोकींग कोळशाच्या  खाणींचे झाले.
    b) कोकींग कोळशाच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण सन १९७२ मध्ये झाले व त्या हिंदुस्थान कोकिंग कोल  लिमिटेड मध्ये विलीन झाल्या. 
    पर्यायी उत्तरे -
    १) केवळ (a) 
    २) केवळ (b) 
    ३) काहीही नाही
    ४) दोन्ही
     
    १३५) श्रम व सशक्तीकरण मंत्रालयाची मुख्य जबाबदारी आहे ः
    a) समाजातील कामगार विशेषतः गरीब, वंचित आणि निराधार यांच्यासाठी संरक्षण व सुरक्षाकवच देणे.
    b) उच्चतम उत्पादन व उत्पादकता निर्मितीसाठी कामाचे निरोगी वातावरण निर्माण करणे.
    c) व्यावसायिक कौशल्य, प्रशिक्षण आणि रोजगार सेवांचा समन्वय साधून विकास करणे.
    d) मजूरांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (d) वाक्य बरोबर आहे.
    २) फक्त (a), (d) वाक्य बरोबर आहेत.
    ३) फक्त (b), (c) वाक्य बरोबर आहेत.
    ४) वरील सर्व वाक्य बरोबर आहेत.
     
    १३६) खालीलपैकी कामगार कल्याणाची ध्येय कोणती?
    a) कामगारांना अधिक चांगले जीवन व आरोग्य पुरविणे.
    b) कामगारांना आनंदी व समाधानी बनविणे.
    c) औद्योगिक थकण्यापासून कामगारांची सुटका करणे.
    d) कामगारांची बौद्धिक, सांस्कृतिक व जीवनाच्या भौतिक परिस्थितीत सुधारणा करणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a), (b) आणि (c)
    २) फक्त (a) आणि (d)
    ३) (a), (b), (c) आणि (d)
    ४) फक्त (d)
     
    १३७) मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी (SRMS) पुनर्वसनाच्या स्वयंरोजगार योजनेचा काय उद्देश आहे?
    १) मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्यावरती अवलंबून असणार्यांाच्यासाठी वैद्यकीय सेवा.
    २) मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्यावरती अवलंबून असणार्यांासाठी मोफत गृहनिर्माण.
    ३) राहिलेले मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्यावरती अवलंबून असणार्यांाचे पुनर्वसन
    ४) मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्यावरती अवलंबून असणार्यांाच्यासाठी मोफत अन्न सोय
     
    १३८) पुढीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/त ?
    a) महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनातर्फे पब्लिक स्कूलस्,स्थापना केली गेली आहेत.
    b) अस्वच्छ व्यवसायात काम करणार्याे कोणत्याही जाती धर्माच्या कामगारांच्या मुलांना, शासनाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसते. 
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त
    २) (b) फक्त         
    ३) (a) आणि (b) 
    ४) दोन्ही (a) आणि (b) विधाने चूक आहेत 
     
    १३९) प्रधान मंत्री श्रम पुरस्काराबाबत काय योग्य आहे?
    a) हे पुरस्कार जे विभागीय उपक्रम आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात (केंद्र किंवा राज्य सरकारांच्या) कामगार आहेत त्यांनाच दिले जातात व ते उत्पादन व इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्यां ना दिले जातात.
    b) श्रम श्री व श्रम वीर या पुरस्कारांमध्ये श्रम श्री श्रेष्ठ पुरस्कार आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) केवळ (a)
    २) केवळ (b)
    ३) दोन्ही
    ४) एकही नाही
     
    १४०) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहे / आहेत?
    a) आपल्याकडील सर्व रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयांना देणे सर्व सार्वजनिक उद्योगांना बंधनकारक आहे.    
    b) संपूर्ण खाजगी क्षेत्राने सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.
    c) औद्योगिक क्षेत्रातील खाजगी उद्योगांना सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.
    d) केवळ २५ पेक्षा अधिक कामगार असलेल्या बिगरशेती खाजगी उद्योगांना सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) केवळ (a)
    २) केवळ (a) आणि (d)
    ३) केवळ (a), (c) आणि (d)
    ४) केवळ (a) आणि (b) 
     
    १४१) ”हुनर से रोजगार” या योजनेचा उद्देश काय?
    १) ग्रामीण बलुतेदारांना रोजगाराचे कौशल्य प्रशिक्षण देणे.
    २) आदरातिथ्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यास्तव दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींकरिता योजना.
    ३) राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू केलेली एक उपाययोजना.
    ४) केंद्र शासनाने बेरोजगार व आठव्या वर्गापेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी सुरू केलेला कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम.
     
    १४२) खालीलपैकी कोणत्या योजनांचा हेतू रोजगार निर्मिती आहे?
    a) मेक इन इंडिया   
    b) कुशल भारत योजना 
    c) राष्ट्रीय जीवनवृत्ती सेवा प्रकल्प    
    d) स्टार्ट अप इंडिया
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b)
    २) (a) आणि (c) 
    ३) (a),(b) आणि (d)
    ४) वरील सर्व 
     
    १४३) असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने कोणती निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे?
    a) पंतप्रधान जनधन योजना
    b) पंतप्रधान सुरक्षा योजना
    c) पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
    d) अटल पेन्शन योजना
    वरीलपैकी कोणती योजना बरोबर आहे/आहेत?
    पर्यायी उत्तरे :
    १) केवळ (c)
    २) केवळ (d)
    ३) (a), (b) आणि (d)
    ४) वरील सर्व
     
    १४४) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ...... साली आपला १०० वा वर्धापन दिन साजरा केला.
    १) २०१९
    २) २०१८
    ३) २०२४
    ४) २०३०
     
    १४५) सन १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारा बालकामगारांवर प्रतिबंध करण्याकरिता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम (IPEC) ची सुरुवात झाली. ज्यामध्ये सहभागी होणारा पहिला देश ...... होता.
    १) भारत
    २) ऑस्ट्रेलिया
    ३) इंग्लंड
    ४) चीन
     
    १४६) कामगारांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटन करण्यासाठी दुसर्याी महायुद्धाच्या काळात ...... ही संघटना स्थापन झाली.
    १) इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन
    २) वर्कर्स वर्ल्ड फोरम
    ३) वर्ल्ड युनियन ऑफ वर्कर्स
    ४) वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनियन्स
     
    १४७) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
    a) आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेची स्थापना लिस्बन कराराप्रमाणे करण्यात आली.
    b) तिने जागतिक युद्ध II संपविले. 
    वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
    पर्यायी उत्तरे :
    १) केवळ (a)
    २) केवळ (b)
    ३) काहीही नाही  
    ४) दोन्ही
     
    १४८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    a) आय. एल. ओ. च्या अंदाजा नुसार सन २०१४ मध्ये भारतात बेकारीचा दर ३.८% वाढू शकेल.
    b) भारतात बेकारी गेल्या तीन वर्षात वाढत आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) फक्त 
    २)  (b)  फक्त
    ३) यापैकी कोणतेही नाही
    ४) दोन्हीही
     
    १४९) १९१९ साली स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय कामगार संस्था (ILO) ही विशेष त्रिस्तरीय आराखड्यानुसार काम करते; जेणेकरन सर्वांना समान न्याय मिळावा. या आराखड्यातील तीन सदस्य गट म्हणजे :
    १) नियोक्ते, युनियन नेते आणि कामगार
    २) व्यवस्थापन समिती, युनियन नेते आणि कामगार
    ३) सरकार, राजकीय पक्ष आणि युनियन नेते
    ४) सरकार, नियोक्ते आणि कामगार
     
    १५०) ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटने’ बाबतच्या विधानांचा विचार करा :
    a) ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटने’ ची स्थापना माद्रिदच्या तहाप्रमाणे झाली.
    b) सुरुवातीला ती राष्ट्रसंघाशी संलग्न होती.
    c) तिची ध्येये आणि उद्दिष्टे ‘फिलाडेल्फिया जाहिरनाम्यात’ नमूद करण्यात आली आहेत.
    d) ‘आयएलओ’ च्या सचिवालय ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक कार्यालय’ म्हणतात.
    e) तिचे प्रशिक्षण केंद्र फ्रांसमध्ये आहे.
    वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत?
    १) (a) आणि (b)
    २) (c) आणि (e)
    ३) (a) आणि (e)
    ४) केवळ (e)
     
    १५१) a) १९१९ साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली.
    b) १९४६ साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली विशेषीकृत एजेंसी बनली.
    c) १९९१ साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बाल कामगार निर्मूलनाकरिता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला.
    d) सध्या एकूण १६७ देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सदस्य आहेत.
    वरीलपैकी योग्य विधाने कोणती ?
    १) (a), (b), (c) विधाने योग्य आहेत
    २) (b), (c), (d) विधाने योग्य आहेत.
    ३) (a), (b) विधाने योग्य आहेत.
    ४) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.
     
    १५२) आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (आय.एल.ओ.) मानक क्र. ८१ ......... शी संबंधित आहे.
    १) बेरोजगारी
    २) किमान वय (उद्योग)
    ३) सामाजिक सुरक्षितता
    ४) कामगार तपासणी
     
    १५३) आय.एल.ओ. (I.L.O.)  ची कोणती सर्वोच्च यंत्रणा संकेत व ठराव पारित करते ?
    १) इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स
    २) गव्हर्निंग बॉडी 
    ३) इंटरनॅशनल लेबर इन्स्टिट्यूट
    ४) इंटरनॅशनल लेबर ऑफिस
     
    १५४) आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या विभिन्न जबाबदार्यांचमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो ?           
    a) आंतरराष्ट्रीय श्रम मानक निश्चि्त करणे.
    b) सर्व स्वरूपातील जबरी/सक्तीचे श्रम नष्ट करणे
    c) बाल मजुरीचे उच्चाटन करणे.
    d) संशोधन आणि माहितीचा प्रसार करणे.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (d) फक्त
    २) (b) आणि (c) फक्त 
    ३) (a), (b) आणि (c)
    ४) सर्व (a), (b), (c) आणि (d)
     
    १५५) खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे/त?
    a) भारत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा स्थायी सदस्य आहे.
    b) भारत आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा सदस्य या नात्याने श्रमिक कल्याणाच्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या मूल्यांकनासाठी योगदान देतो.
    c) जिनिवा येथे २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे १०४ वे सत्र संपन्न झाले.
    d) जेनेवा येथे २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाचे ३२४ वे सत्र संपन्न झाले.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a), (c)
    २) फक्त (b), (d)
    ३) फक्त (a), (b), (c)
    ४) वरील सर्व
     
    १५६) आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने एच. आय. व्ही./एड्स आणि कामगार जगासंबंधी मांडलेल्या आचारसंहितेमध्ये खालील मुद्द्यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.
    a) एच. आय. व्ही/एड्स चा प्रसार रोखणे.
    b) कलंक किंवा लांछनाची भावना दूर करणे.
    c) बाधीत कामगारांची देखभाल आणि त्यांना आधार देणे.
    पर्यायी उत्तरे -
    १) फक्त (a) बरोबर आहे.
    २) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
    ३) (a) आणि (c) बरोबर आहेत.
    ४) फक्त (c) बरोबर आहे.
     
    उत्तरे : प्रश्नतमंजुषा (१२५)
    १-३
    २-३
    ३-३
    ४-४
    ५-३
    ६-४
    ७-२
    ८-२
    ९-३
    १०-४
    ११-१
    १२-१
    १३-४
    १४-१
    १५-२
    १६-३
    १७-३
    १८-२
    १९-३
    २०-३
    २१-१
    २२-४
    २३-४
    २४-१
    २५-४
    २६-२
    २७-४
    २८-१
    २९-१
    ३०-४
    ३१-४
    ३२-३
    ३३-३
    ३४-३
    ३५-१
    ३६-३
    ३७-२
    ३८-१
    ३९-३
    ४०-३
    ४१-३
    ४२-२
    ४३-१
    ४४-२
    ४५-३
    ४६-३
    ४७-२
    ४८-२
    ४९-२
    ५०-४
    ५१-१
    ५२-३
    ५३-३
    ५४-३
    ५५-१
    ५६-३
    ५७-२
    ५८-२
    ५९-४
    ६०-४
    ६१-१
    ६२-३
    ६३-३
    ६४-३
    ६५-१
    ६६-४
    ६७-१
    ६८-१
    ६९-२
    ७०-४
    ७१-१
    ७२-१
    ७३-४
    ७४-२
    ७५-४
    ७६-२
    ७७-४
    ७८-१
    ७९-३
    ८०-३
    ८१-३
    ८२-४
    ८३-३
    ८४-१
    ८५-४
    ८६-१
    ८७-२
    ८८-४
    ८९-४
    ९०-३
    ९१-२
    ९२-२
    ९३-३
    ९४-३
    ९५-२
    ९६-३
    ९७-३
    ९८-३
    ९९-२
    १००-२
    १०१-४
    १०२-२
    १०३-१
    १०४-४
    १०५-१
    १०६-१
    १०७-४
    १०८-३
    १०९-२
    ११०-४
    १११-२
    ११२-४
    ११३-२
    ११४-२
    ११५-४
    ११६-४
    ११७-४
    ११८-४
    ११९-२
    १२०-३
    १२१-१
    १२२-३
    १२३-४
    १२४-४
    १२५-२
    १२६-१
    १२७-३
    १२८-३
    १२९-४
    १३०-४
    १३१-४
    १३२-१
    १३३-४
    १३४-३
    १३५-४
    १३६-३
    १३७-३
    १३८-३
    १३९-४
    १४०-२
    १४१-२
    १४२-४
    १४३-२
    १४४-१
    १४५-१
    १४६-४
    १४७-३
    १४८-३
    १४९-४
    १५०-३
    १५१-१
    १५२-४
    १५३-१
    १५४-४
    १५५-४
    १५६-२
     
     

     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 2043