1) नवी दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात अटक केलेली दिशा रवी ही कोण आहे ?
1) ग्रेटा थोर्नबर्गची सहकारी
2) नवी दिल्लीतील मानवी हक्क कार्यकर्ती
3) बंगळुरूतील पर्यावरणवादी कार्यकर्ती
4) एल्गार परिसदेची निमंत्रक
2) टूलकिट संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) एखाद्या आंदोलनाचे सोशल मीडियातील पोस्टर म्हणजे टूलकिट
ब) आंदोलकांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणारे माध्यम
क) एखादे आंदोलन तीव्र करण्यासाठी तयार केलेला कृती कार्यक्रम
ड) जगभरच्या आंदोलकांसाठी मायक्रोसॉफ्टने तयार केलेला ़कृती कार्यक्रम
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
3) खालीलपैकी कोणत्या आंदोलनात टूलकीटचा वापर करण्यात आला होता ?
अ) दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन
ब) म्यानमारमधील लष्करशाहीविरोधी आंदोलन
क) ब्लॅक लीव्हज मॅटर
ड) क्लायमेट स्ट्राईक कँपेन
इ) हाँगकाँगमधील विद्यार्थी आंदोलन
फ) अरब स्प्रिंग
ग) थायलंडमधील राजेशाहीविरोधी आंदोलन
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) अ, क आणि ड
4) ड, फ, ग वगळता सर्व
4) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
अ) 16 फेब्रुवारी 2021 रोजी बंगळुरूतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणी अटक केली.
ब) दिशा रवीने शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट संपादित करून जे बदल केले ते ग्रेटा थनबर्गने रिट्विट केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही