थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन / प्रश्नमंजुषा (92)

  •  थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन  / प्रश्नमंजुषा  (92)

    थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन / प्रश्नमंजुषा (92)

    • 22 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 100 Views
    • 0 Shares

    थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन : प्रश्नमंजुषा  (92) 

    1) 3 बोटांच्या सलामासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) हा सलाम हुकूमशाही व्यवस्थेला विरोध करण्याचं प्रतिक म्हणून वापरला जातो. 
    2) 2020 साली हाँगकाँगमधील  अंब्रेला रिव्हल्यूशन काळात हा सलाम आंदोलनकर्त्यांनी वापरला होता.
    3) हा सलाम करण्याची पद्धत सुझॅन कॉलिन्सचे चित्रपट आणि हंगर गेम्स पुस्तकामधून झाली.
    4) 2021 मध्ये म्यानमारमधील आंदोलकांकडून वापरला जाणारा हा सलाम हा विरोधाचं प्रतिक आहे. 
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) सध्या म्यानमारमध्ये लष्करी हुकूमशाह कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंग यांची सत्ता आहे.
    ब)  2020 साली म्यानमारमध्ये  नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाची सत्ता होती.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) 3 बोटांचा सलाम  कोणाला केला जातो ?
    1) लोकप्रिय नेत्या आंग सान सूू ची यांच्यासाठी आंदोलन करणार्‍यांना.
    2) काल्पनिक जगातील हुकुमशाह असणार्‍या प्रेसिडंट स्नो च्या शासनाविरोधात आवाज उठवणार्‍यांना.
    3) हुकूमशाही व्यवस्थेचे समर्थन करणार्‍यांना
    4) वरील सर्व
     
    4) तीन बोटांचा सलाम कोणकोणत्या आम्दोलनात वापरण्यात आला होता ?
    अ) थायलंडमधील राजाविरोधातील आंदोलन  2020
    ब) म्यानमारमधील आरोग्य सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे आंदोलन 
    क) हाँगकाँगमधील अंब्रेला रिव्हल्यूशन 2014
    ड) चीनमधील सिनकियांग प्रांतातील उईघर मुस्लीमांचे आंदोलन 2019
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    5) कोणत्या देशातील लष्कराने 3 बोटांच्या सलामावर यावर बंदी घातली आहे ?
    1) म्यानमारमधील
    2) चीनमधील
    3) थायलंडमधील 
    4) हाँगकाँगमधील 
     
    6) इंटरनेटद्वारे केल्या जाणार्‍या पेपे आणि फ्रॉगसारख्या गोष्टींच्या वापराबाबत खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 2021 मध्ये म्यानमारमधील लोकांनी लष्करी राजवटीस विरोध दर्शवण्यासाठी याचा वापर केला. 
    ब) 2016 साली याचा वापर अमेरिकेतील आंदोलनात करण्यात आला होता.
    क) 2020 मध्ये भारतातील शेतकरी आंदोलनात याचा वापर करण्यात आला होता.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
    उत्तरे  :  प्रश्नमंजुषा (92)
    1-2
     
    2-3
     
    3-2
     
    4-1
     
    5-3
     
    6-2
     
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 100