आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (121)

  • आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार /  प्रश्‍नमंजुषा (121)

    आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (121)

    • 09 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 674 Views
    • 0 Shares

    प्रश्‍नमंजुषा (121)

    1) महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंदर्भात खालील विधाने विचारा घ्या.
    अ) महाराष्ट्र भूषण पुरस्कारांसाठी सुरुवात 1996 मध्ये झाली.
    ब) महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.
    क) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.
    ड) 2008 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी आणि मंगेश पाडगावकर यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.
    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
    1) अ, ब आणि ड
    2) ब, क आणि ड
    3) अ, क आणि ड
    4) अ, ब, क आणि ड

    2) खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष असतात ?
    1) महाराष्ट्राचे राज्यपाल 
    2) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 
    3) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री 
    4) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य सचिव

    3) ’आशा भोसले’ यांचेबाबत खालील विधाने विचार घ्या :
    a) त्यांना 2 वेळा बेस्ट प्लेबॅक सिंगर साठी राष्ट्रीय फिल्म अ‍ॅवॉर्ड मिळाले. 
    b) त्यांना बीबीसी आकाशवाणीच्या वतीने  ब्रिटनचे तत्काश्रलीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार (2002) देण्यात आला होता.
    c) त्यांनी केंद्र सरकारने राज्यसभेवर खासदार म्हणून नेमले होते.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने (a) आणि (c) बरोबर आहेत
    2) विधाने (b) आणि (c) बरोबर आहेत
    3) विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत
    4) विधाने (a), (b) आणि (c) बरोबर आहेत

    4) खालील जोड्या अचूक जुळवा :
        स्तंभ अ (महाराष्ट्रभूषणप्राप्त पहिली व्यक्ती)           स्तंभ ब (क्षेत्र)
    अ.  सुलोचना लाटकर                                                   I. आरोग्यसेवा
    ब.  डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग                             II. मराठी चित्रपट
    क.  सुनील गावस्कर                                                   III. क्रीडा
    ड.  पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांड                                     IV. साहित्य
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    1)   II   III   I   IV
    2)   II   I   III   IV
    3)   III   II   IV   I
    4)   IV   III   I   II

    5) महाराष्ट्र भूषण पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) हा महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रसमूहाने पुरस्कृत केलेला सामाजिक पुरस्कार आहे.
    ब) डॉ. रघुनाथ माशेलकर हे सदर बहुमान मिळविणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत.
    क) सुनील गावस्कर हे सदर बहुमान मिळविणारे पहिले खेळाडू आहेत.
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
    1) फक्त अ आणि ब
    2) फक्त ब आणि क
    3) फक्त क
    4) वरीलपैकी सर्व

    6) ’आशा भोसले’ यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) त्यांना 2020 चा ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. 
    ब) त्यांचा जन्म सांगली येथे झाला. 
    क) त्यांना भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार (1987) मिळाला आहे.
    ड) गुजरात सरकारने त्यांना दयावती मोदी पुरस्काराने (1998) सन्मानित केले आहे.
    वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
    1) फक्त अ, ब आणि क
    2) फक्त ब, क आणि ड
    3) फक्त क आणि ड
    4) अ, ब, क आणि ड

    7) खालील विधाने लक्षात घ्या :
    अ) रामराव कृष्णराव उर्फ आर.के.पाटील  यांना मरणोत्तर ”महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देण्यात आला.
    ब) डॉ. विजय भाटकर यांना ”महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देण्यात आला होता.
    क) रतन टाटा यांना 2016 मध्ये ”महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देण्यात आला.
    ड) सचिन तेंडुलकर यांना 2011  मध्ये ”महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देण्यात आला.
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत?
    1) फक्त अ
    2) फक्त ब आणि ड
    3) फक्त ब आणि क
    4) फक्त अ आणि ड

    8) 2012 सालापासून ‘’महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी बदललेल्या पात्रता व निकष” बाबत खालील विधाने विचारात घ्या.
    a)  हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींना देताना त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 20 वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.
    b)  संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण कार्य केलेले असावे. 
    c)  कोणत्याही क्षेत्रात संशोधनाद्वारे नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्याबाबतीत विचार करुन 20 वर्षे कामगिरीचा नियम शिथिल करण्यात येतो.
    वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
    1) फक्त (a)
    2) (a) आणि (b)
    3) (b) आणि (c)
    4) फक्त (c)

    9) निम्नलिखित योग्य जोड्या लावा.
         स्तंभ-I (क्षेत्र)      स्तंभ-II (महाराष्ट्रभूषणप्राप्त मान्यवर)
    a)  समाजप्रबोधन                 (I)  रतन टाटा
    b)  उद्योग                          (II)  बाबासाहेब पुरंदरे
    c)  साहित्य                         (III)  रामराव कृष्णराव उर्फ आर. के. पाटील
    d)  लोक प्रशासन                 (IV)  डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    2)   (iv)   (i)   (ii)   (iii)
    3)   (iii)   (i)   (iv)   (iii)
    4)   (iii)   (iv)   (ii)   (iv)

    10) महाराष्ट्रभूषण या नावाचा पुरस्कार देणार्‍या संस्था कोणत्या ?
    a) महात्मा कबीर समता परिषद
    b) पनवेल वेल्फेअर सोशल क्लब
    c) महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र समूह
    d) महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    e) महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (c) आणि (e) फक्त
    2) (b), (c), (d) आणि (e) फक्त
    3) (a), (b), (c) आणि (e) फक्त
    4) (a), (b), (c), (d) आणि (e)

    11) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) कला
    ब) पत्रकारिता
    क) विज्ञान
    ड) आरोग्यसेवा
    इ)  उद्योग
    फ) लोकप्रशासन
    ग) क्रीडा
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व

    12) ’आशा भोसले’ यांचेबाबत खालीलपैकी अचूक विधान कोणते ?
    1) त्यांनी चित्रपट गायनाची सुरुवात चुनरिया या चित्रपटातून केली. 
    2) त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी ‘गणपतराव भोसले’ यांच्याशी विवाह केला.
      3) 2011 साली त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे) नोंदवण्यात आले.
    4) 2019 साली मराठी चित्रपट ‘माई’ मध्ये प्रथमच त्यांनी अभिनय केला.

    13) ’आशा भोसले’ यांच्या संदर्भात खालील जोड्या अचूक जुळवा :
                स्तंभ अ (पहिला पुरस्कार)                                   स्तंभ ब (वर्ष)
    अ)  सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार      I. 1981
    ब)   फिल्म फेयर अ‍ॅवॉर्ड                                     II. 1967
    क)  मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार             III. 1989
    ड)  एमटीव्ही अ‍ॅवॉर्ड                                                         IV. 2001
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    1)   I   II   III   IV
    2)   II   IV   III   I
    3)   III   II   IV   I
    4)   IV   III   I   II

    14) ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या :
    a)  सध्या या पुरस्काराची रक्कम रु.10 लाख इतकी आहे. 
    b)  महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणार्‍या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसर्‍या व्यक्ती आहेत.
    c)  1998 मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ देण्यात आला होता. 
    पर्यायी उत्तरे :
    1)  विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत
    2)  विधाने (b) आणि (c) बरोबर आहेत
    3)  विधाने (a), (b) आणि (c) बरोबर आहेत
    4)  केवळ विधान (b) बरोबर आहेत

    15) ’आशा भोसले’  यांच्या संदर्भात पुढील विधानांवर विचार करा.
    अ)  त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाणी गायली आहेत.
    ब)  त्यांना मध्यप्रदेश सरकार आणि  महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार  मिळाला आहे.
    क)  20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये त्यांनी गायन केलं आहे.
    वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
    1) केवल ‘अ‘ विधान बरोबर आहे
    2) केवल ‘ब‘ विधान बरोबर आहे
    3) केवल ‘क‘ विधान बरोबर आहे
    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत

    16) महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे ?
    अ) जयंत नारळीकर
    ब) अनिल काकोडकर
    क) नानासाहेब धर्माधिकारी 
    ड) सुलोचना लाटकर
    पर्यायी उत्तरे :
    1)  फक्त अ आणि ब
    2) फक्त अ,ब आणि क  
    3) फक्त अ,ब आणि ड 
    4) वरीलपैकी सर्व 

    17) योग्य कथन/कथने ओळखा :
    अ) आशाताईंना बॉलीवूडमध्ये ’मेलडी क्वीन’ म्हणून ओळखलं जातं.  
    ब) आशाताईंची रेस्टॉरंट दुबई, सिंगापुर, कुवैत, आणि मुंबई  या ठिकाणी 4 रेस्टॉरंटस आहेत. 
    1) फक्त कथन अ
    2) फक्त कथन ब
    3) दोन्ही कथने अ आणि ब बरोबर आहेत.
    4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत.

    18) आतापर्यंत (2021) महाराष्ट्र भूषण पुरस्कार किती माान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत ?
    1) 20 
    2) 19
    3) 21
    4) 18

    19) निम्नलिखित योग्य जोड्या लावा.
          स्तंभ-I (वर्ष)         स्तंभ-II (महाराष्ट्रभूषणप्राप्त मान्यवर)
    a)  1998     (i)  पं. भीमसेन जोशी
    b)  2002    (ii)  आशा भोसले 
    c)  2009    (iii)  लता मंगेशकर
    d)  2020    (iv)  सुलोचना लाटकर
    पर्यायी उत्तरे :
      (a)   (b)   (c)   (d)
    1)   (i)   (ii)   (iii)   (iv)
    2)   (iv)   (i)   (ii)   (iii)
    3)   (iii)   (i)   (iv)   (iii)
    4)   (iii)   (iv)   (ii)   (iv)

    20) महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या -
    अ) तो फक्त मराठी व्यक्तीला दिला जातो. 
    ब)  त्याची स्थापना 1997 मध्ये झाली
    क) हा पुरस्कार देताना, पदम पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येते.
    ड)  पुरस्कारप्राप्त व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच उल्लेखनीय कार्य केलेले असावे. 
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    1) अ, ब, क
    2) ब, क, ड
      3) अ, ब, क, ड
    4) अ आणि क फक्त 

    21) खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे सदस्य सचिव असतात ?
    1)  महाराष्ट्राचे राज्यपाल 
    2)  महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य सचिव
    3)  महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री 
    4)  महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य सचिव

    22) ’आशा भोसले’ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
    अ)  2015 साली बीबीसीच्या 100 इन्स्पायरिंग वुमनमध्ये आशा भोसले यांचा समावेश झाला होता.
    ब)  ग्रॅमी अ‍ॅवॉर्डकरता नामांकित होणार्‍या पहिल्या भारतीय गायिका (1997) आहेत.
    क)  अमरावती व जळगाव विद्यापीठाने त्यांना साहित्यातील डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित केले.
    1) (अ)
    2) (ब)
    3) (क)
    4) वरीलपैकी एकही नाही

    23) ’आशा भोसले’ यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ)  त्यांना 18 वेळा आशाताई भोसले यांना फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.
    ब)  त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (2000) सन्मानित केले गेले आहे.
    क)  त्यांना भारत सरकारने 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
    ड)  अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) मार्फत त्यांच्या नावाने चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणार्‍या पार्श्‍वगायकास पुरस्कार दिला जातो.
    वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
    1) फक्त अ, ब आणि क
    2) फक्त ब, क आणि ड
    3) फक्त अ आणि ड
    4) अ, ब, क आणि ड

    24) खालील जोड्या विचारात घ्या :
    अ) सांस्कृतिक कार्य संचालक : बिभीषण चवरे 
    ब) सांस्कृतिक कार्य मंत्री : अमित विलासराव देशमुख
    क) सांस्कृतिक कार्य सचिव  : सौरभ विजय
    ड) सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री : राजेंद्र पाटील यड्रावकर,
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, ब,  क आणि ड बरोबर

    25) खालील जोड्या अचूक जुळवा :
        स्तंभ अ (महाराष्ट्रभूषणप्राप्त शास्त्रज्ञ)              स्तंभ ब (वर्ष)
    अ) डॉ. विजय भाटकर                                I. 2000
    ब) डॉ. रघुनाथ माशेलकर                       II. 2005
    क) डॉ. जयंत नारळीकर                      III. 2010
    ड) डॉ. अनिल काकोडकर                              IV. 2011
    पर्यायी उत्तरे :
      अ   ब   क   ड
    1)   II   III   IV   I
    2)   I   II   III   IV
    3)   III   II   IV   I
    4)   IV   III   I   II

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (121)
     
    1-2
     
    2-2
     
    3-3
     
    4-2
     
    5-3
     
    6-4
     
    7-2
     
    8-3
     
    9-2
     
    10-3
     
    11-1
     
    12-3
     
    13-1
     
    14-3
     
    15-4
     
    16-4
     
    17-3
     
    18-4
     
    19-3
     
    20-2
     
    21-2
     
    22-4
     
    23-4
     
    24-4
     
    25-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 674