केंद्रशासित प्रदेश व घटक राज्ये : प्रश्नमंजुषा : (101)

  • केंद्रशासित प्रदेश व घटक राज्ये :  प्रश्नमंजुषा : (101)

    केंद्रशासित प्रदेश व घटक राज्ये : प्रश्नमंजुषा : (101)

    • 01 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 428 Views
    • 1 Shares

     प्रश्नमंजुषा 101

    1) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होय ?
    1) 366 
    2) 239 ए
    3) 239 ए ए
    4) 241
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) पुदुच्चेरी विधानसभेत एकूण 33 जागा आहेत. 
    ब) यातील 32 सदस्य आमदार निवडून येतात, तर 1 सदस्यांची नेमणूक नायब राज्यपाल करतात.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (प्रांताचा प्रकार) स्तंभ ब (उदाहरण)
    अ. भाग अ प्रांत I. पेप्सू (पंजाब अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन)
    ब. भाग ब प्रांत II. अंदमान व निकोबार
    क. भाग क प्रांत III. पूर्व पंजाब
    ड. भाग ड प्रांत IV. विंध्य प्रदेश 
    पर्यायी उत्तरे :
          अ
    (1) II III IV I
    (2) III I II IV
    (3) III I     IV II
    (4) IV III I       II
    4) खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकाला नायब राज्यपाल म्हटले जात नाही ?
    1) दिल्ली
    2) अंदमान व निकोबार 
    3) चंदीगड
    4) पद्दुचेरी
     
    5) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1818 ते 1956 दरम्यान मुंबई ही मुंबई प्रांताची राजधानी होती. 
    ब) 1956 साली मुंबई ही द्विभाषिक मुंबई राज्याची राजधानी बनली.
    क) 1861 पासून 1956 पर्यंत नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती.
    ड) 1960 सालापासून ती महाराष्ट्राची राजधानी आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    6) 1950 च्या मूळ राज्यघटनेत असलेल्या चीफ कमिशनर यांच्या किती प्रांतांचा समावेश भाग क व ड प्रांत म्हणून करण्यात आला व त्यांना पुढे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला ?
    1) 8
    2) 9
    3) 10
    4) 11
     
    7) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (जिल्हा) स्तंभ ब (महत्त्वाची भाषा)
    अ. पुडुचेरी I.  तमीळ
    ब. कोराईकल II. तेलगू
    क. यानम III. फ्रेंच
    ड. माहे               IV.  मल्याळी
    पर्यायी उत्तरे :
    (1) II     III     I IV
    (2) IV    I      III II
    (3) III I II IV
    (4) I III    I II
     
    8) 1962 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पुड्डुचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला ?
    1) 11 व्या घटनादुरुस्तीद्वारे 
    2) 12 व्या घटनादुरुस्तीद्वारे 
    3) 13 व्या घटनादुरुस्तीद्वारे 
    4) 14 व्या घटनादुरुस्तीद्वारे 
     
    9) कोणत्या तरतुदीनुसार दिल्लीसाठी विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आली. 
    अ) 69 वी घटना दुरुस्ती कायदा 1991
    ब) केंद्रशासित प्रदेशांचे शासन कायदा 1991
    क) केंद्रशासित प्रदेशांचे शासन कायदा 1993
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    10) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
    1) 14 वी घटना दुरुस्ती कायदा 1962
    2) 69 वी घटना दुरुस्ती कायदा 1991
    3) केंद्रशासित प्रदेशांचे शासन कायदा 1963
    4) केंद्रशासित प्रदेशांचे शासन कायदा 1963
     
    11) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 26 जानेवारी 1950 - संयुक्त प्रांताचे नाव बदलून उत्तर प्रदेश असे ठेवण्यात आले.
    ब) 1 नोव्हेंबर 1959 - मध्य भारत प्रांताचे नाव बदलून मध्य प्रदेश ठेवले गेले.
    क) 11 नोव्हेंबर 2011 - ओरिसाचे नाव बदलून ओडिशा असे ठेवण्यात आले
    ड) 1 जानेवारी 2007 - उत्तरांचलचे नाव बदलून उत्तराखंड असे ठेवण्यात आले.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    12) कोणत्या साली पाँडीचेरीचे नाव बदलून पुदुच्चेरी असे ठेवण्यात आले ?
    1) 2016
    2) 2011
    3) 2006
    4) 2001
     
    13) 1956 साली खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात नव्हता ?
    1) अंदमान बेटे
    2) लक्षद्वीप बेटे 
    3) अरुणाचल प्रदेश
    4) मणिपूर
     
    प्रश्नमंजुषा : (101)

    1-1
     
    2-1
     
    3-3
     
    4-3
     
    5-4
     
    6-4
     
    7-3
     
    8-4
     
    9-1
     
    10-3
     
    11-4
     
    12-3
     
    13-3
     
     

     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 428