इंडोनेशिया / प्रश्नमंजुषा (24)
- 23 Nov 2020
- Posted By : Study Circle
- 224 Views
- 0 Shares
इंडोनेशिया
मुस्लिमबहुल इंडोनेशियात हिंदू 2% हून कमी असले तरी येथील संस्कृतीत राम आणि शिव रुजलेले आहेत. येथे भारताप्रमाणेच सणोत्सव साजरे केले जातात. येथील बाली, सुमात्रा आणि सुलावेसी, पश्चिम पापुआत दिवाळी मुख्य पर्व आहे. दिवाळीच्या 30 दिवसांपूर्वीच विधी सुरू होतात. नागरिक 30 दिवसांपर्यंत व्रत ठेवतात.
1) गलुंगन : जगभर भ्रमंती करणारे इटलीतील लेखक वर्थीमांनी 1502 ते 1508 दरम्यान दक्षिण आशियाचा दौरा केला होता. त्यांनी या प्रवासवर्णनात भारतातील विजयनगरप्रमाणे सुमात्रात होणार्या आतषबाजीचा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी अधर्मावर धर्माचा विजय म्हणून दिवाळी साजरी केली जाते. स्थानिक भाषेत याला गलुंगन म्हणतात. हा सण दर 210 दिवसांनी येतो.
2) प्रम्बनन मंदिर : जावातील योगाकार्ता शहरात हिंदूंचे सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र असलेले प्रम्बनन मंदिर वसलेले आहे. 850 इसवी सनात उभारण्यात आलेल्या या मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे. येथे ब्रह्मा, विष्णू व महादेवाची मंदिरे आहेत. हे संजय वंशाचे शासक रकाई पिकातन यांनी उभारले होते. येथील प्राचीन अॅम्फी थिएटर दररोज सादर केल्या जाणार्या रामायणासाठी प्रसिद्ध आहे. 1976 पासून येथे दररोज रामायणाचे सादरीकरण होते. हा जगातील सर्वाधिक काळ चालणारा स्टेज शोदेखील आहे. यातील कलाकारांपासून ते प्रेक्षकांमध्ये मुस्लिमधर्मीय मोठ्या प्रमाणात भाग घेतात.
3) धार्मिक शिक्षणात रामायण : 20 हजारांपेक्षा जास्त मंदिरे असणार्या बालीत 80% हिंदूधर्मीय आहेत. हिंदूंच्या धार्मिक शिक्षणात रामायणाचा समावेश केला आहे. येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणात रामायणाचा समावेश आहे.
प्रश्नमंजुषा (24)
1) इंडोनेशियातील हिंदू संस्कृती संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) येथील बाली, सुमात्रा आणि सुलावेसी, पश्चिम पापुआत दिवाळी सण साजरा केला जातो.
ब) जावातील योगाकार्ता शहरात हिंदूंचे सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र असलेले प्रम्बनन मंदिर वसलेले आहे.
क) 20 हजारांपेक्षा जास्त मंदिरे असणार्या बालीत 60 % हिंदूधर्मीय आहेत.
ड) मुस्लिमबहुल इंडोनेशियात हिंदूंची लोकसंख्या 2% हून थोडी जास्त अहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) अ आणि ब
3) क आणि ड
4) फक्त क
2) जगातील सर्वाधिक काळ चालणारा स्टेज शो कोणता ?
1) न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे थेटरमधील लायन किंगचे सादरीकरण
2) शिकागो शहरातील माऊस ट्रॅपचे सादरीकरण
3) फुकेत शहरातील फँटा सी चे सादरीकरण
4) योगाकार्ता शहरातील रामायणाचे सादरीकरण
3) ”गलुंगन” संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) इडोनेशियातील स्थानिक भाषेत दिवाळीला गलुंगन म्हणतात.
ब) हा सण दर 280 दिवसांनी येतो.
क) सुमात्रात बेटावर हा सण आतषबाजी करुन साजरा केला जातो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
4) अ, ब आणि क
4) इंडोनेशियातील प्रम्बनन मंदिराबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
1) हे इंडोनेशियातील हिंदूंचे सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र सुमात्रा बेटावर आहे.
2) 850 साली रकाई पिकातन यांनी सदर मंदिर उभारले होते.
3) या मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे.
4) येथे ब्रह्मा, विष्णू व महादेवाची मंदिरे आहेत.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (24)
1-2
2-4
3-3
4-1